Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ६३ जागांवर भरती

8

YCMOU Nashik Recruitment 2024 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

(फोटो सौजन्य : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अधिकृत वेबसाइट)

सदर भरती प्रक्रिया ६३ जागांसाठी होणार असून, उमेदवारांनी ०३ जानेवारी २०२४ ते १८ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

पदभरतीचा तपशील :

अ‍ॅकॅडमिक कॉर्डीनेटर (Academic Coordinator) : ६३ जागा

अ‍ॅकॅडमिक कॉर्डीनेटर (Academic Coordinator) पदावर निवड होणार्‍या उमेदवारला सुरूवातीचे सहा महीने (हा कालावधी २ वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.) Contractual Period वर काम करावे लागणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नाशिक

(पदभरतीच्या सविस्तर महितीसाठी मूळ जाहिरात वाचा)

असा करा अर्ज :

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकमधील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्ज खालील पत्त्यावर पाठवणे अनिवार्य आहे. हे अर्ज २१ जानेवारी २०२४ पर्यंत खालील पत्त्यावर पोहोचणे गरजेचे आहे.

अर्जाची हार्ड कॉपी या पत्त्यावर पाठवा :

कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, ज्ञानगंगोत्री, गोवर्धन, गंगापूर धरणाजवळ, नाशिक- ४२२२२२.

मिळणार एवढा पगार :

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकमधील भरती अंतर्गत निवड होणार्‍या उमेदवाराला दरमहा ५७ हजार ७००रुपये पर्यंत पगार दिला जाणार आहे

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

० ही भरती प्रक्रिया शैक्षणिक समन्वयक या पदाकरिता होणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता ही पदव्युत्तर पदवी + पात्र NET किंवा पीएच.डी. असणे आवश्यक आहे.

० YCMOU या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड प्रक्रिया ही चाचणी तसेच मुलाखती द्वारे होणार आहे.
महत्त्वाच्या लिंक्स :

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक भरती अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.