Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भुसावळ येथील तरूणावर प्राणघातक हल्ला; चाकूने केले वार..!

13

भुसावळ:शहरातील गडकरी नगरातील रहीवासी असणार्‍या तरूणावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रात्री घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील गडकरी नगरातील रहीवासी असणारा शुभम दिलीप खत्री हा तरूण रात्री अकराच्या सुमारास घरी येत असतांना मागून वेगाने आलेल्या दुचाकीने त्याला धडक दिल्याने तो खाली पडला. यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर चाकूने सपासप वार करून त्याच्याजवळील पैसे व मोबाईल हँडसेट घेऊन पळ काढला.
दरम्यान,या घटनेची माहीती मिळताच बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शुभम दिलीप खत्री याला साकेगांव येथील डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
तर या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.