Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या उपाययोजनेला एअरटेलचा IoT मंच – ‘एअरटेल IoT हब’चेही बळ लाभले आहे, ज्यामुळे ग्राहकांना आपल्या ऊर्जावापरावर अधिक चांगले नियंत्रण मिळवून देणाऱ्या हरक्षणाच्या आकडेवारी व सेवा मिळणार आहेतच, पण त्याचबरोबर प्रगत विश्लेषण सुविधा आणि निदानात्मक क्षमता लाभलेले स्मार्ट मीटर ट्रॅकिंग व देखरेखही शक्य होणार आहे. अदाणी एनर्जी सोल्यूशन्सने आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि उत्तराखंड येथील ऊर्जाकेंद्रांमधून २ कोटी स्मार्ट मीटर्सची मागणी नोंदवली आहे.
एअरटेल बिझनेस (इंडिया) चे सीईओ गणेश लक्ष्मीनारायणन म्हणाले, “भारताचा स्मार्ट मीटरिंग प्रोग्राम हा सरकारने धोरणसुधारणेसाठी हाती घेतलेल्या काही सर्वात लक्षणीय पावलांपैकी एक आहे. ही मीटर्स स्मार्ट ग्रीड्ससाठी पाया उभारण्याचे महत्त्वाचे काम करतात आणि ऊर्जा क्षेत्राचे डिजिटलायझेशन घडवून आणण्याच्या कामात त्यांचे पायाभूत योगदान आहे. युटिलिटीजच्या क्षेत्रामध्ये अधिक चांगले कव्हरेज, उच्च विश्वासार्हता आणि सुरक्षितता यांच्या साथीने स्मार्ट मीटर्सची जोडणी आणि व्यवस्थापन कऱण्यासाठी आपले NB-IoT तंत्रज्ञान लक्षणीय भूमिका निभावेल, अशी एअरटेलची अपेक्षा आहे. अदानी समूहासोबत, युटिलिटीजना डिजिटाइझ करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये दीर्घ आणि फलदायी सहयोगाची आमची अपेक्षा आहे.”
अदानी एनर्जी सोल्युशन्स लि.चे सीईओ कंदर्प पटेल म्हणाले, “भारताची महत्त्वाकांक्षी रिव्हॅम्प्ड डिस्ट्रिब्युशन सेक्टर स्कीम (RDSS) ऊर्जापुरविठ्याच्या आमच्या पद्धतींमध्ये परिवर्तन घडवून आणत आहे आणि या क्रांतीमध्ये अग्रस्थानी असल्याचा AESL ला अभिमान आहे. एअरटेलबरोबची आमची भागीदारी म्हणजे सर्वांसाठी एका अधिक स्मार्ट, अधिक कार्यक्षम ग्रीडचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या धोरणात्मक हातमिळवणीला T&D सेक्टरमधील आमचे सखोल क्रियात्मक निपुणत्व आणि एअरटेलचे जोमदार देशव्यापी नेटवर्क व NB-IoT, 4G LTE यांसह IoT सुविधांचा परिपूर्ण संच या दोन्ही सर्वोत्कृष्ट बाबींचा लाभ मिळत आहे. या शक्तिशाली मिलाफामुळे आम्हाला भारतभरात २ कोटींहून अधिक स्मार्ट मीटर्स बसविण्यासाठी नोंदविण्यात आलेली चालू मागणी विनासायास पूर्ण करता येणार आहे, ज्यातून लक्षावधी ग्राहकांना हरक्षणी होणाऱ्या ऊर्जावापराची आकडेवारी मिळणार आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचे बळ मिळणार आहे, तसेच हे करताना वितरण जाळ्यातील त्रुटीही दूर करता येणार आहेत.”