Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जळगाव: चोपडा येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर विळ्याने वार करून खून केल्याची घटना घडली. संजय पुंजू चव्हाण (वय ४८वर्षे) असे संशयित पतीचे नाव असून पत्नी मीराबाई चव्हाण असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परीसरासह संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान,याबाबत शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर असे की, शहरातल्या फुले नगरातील रहीवासी संजय चव्हाण याचे रविवारी सायंकाळी पत्नी मीराबाई चव्हाण हिच्यासोबत भांडण झाले. याप्रसंगी त्याने संतापात आपल्या पत्नीवर विळ्याने वार केले. यामुळे तिच्या मांडीला जखम झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.तश्याच जखमी अवस्थेत मीराबाई चव्हाण यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मीराबाईंचा मृत्यू झाला. या प्रकरणी या दाम्पत्याचा मुलगा सागर चव्हाण याच्या फिर्यादीवरून संजय चव्हाण याच्याविरूध्द शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.