Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शालेय विद्यार्थ्यांचे ‘अर्ली कोचिंग’ थांबणार; दहावी पूर्वी जेईई किंवा नीट कोचिंगला प्रवेश देणे गैर

11

New Guidelines For Coaching Centers : आजच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना अगदी लहान वयातच करिअरच्या संदर्भात दबावाचा सामना करावा लागतो. आपल्या मुलाने इंजिनीअर व्हावे की डॉक्टर असे प्रश्न अगदी लहान वयातच मुलांचा पाठलाग करू लागतात. आपल्या पाल्याने भविष्यात यशस्वी व्हावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. यासाठी ते लहानपणापासूनच आपल्या मुलांवर दबाव टाकू लागतात. यासोबतच, देशातील मोठ्या शहरांमध्ये चालणाऱ्या JEE आणि NEET कोचिंग सेंटर्समध्ये लहान वयापासूनच मुलांना नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे लहानपणापासूनच भविष्यातील JEE किंवा NEET परीक्षेची इच्छा नसतानाही तयारी करावी लागते.

आता पालक विद्यार्थ्यांवर दबाव टाकू शकणार नाहीत :

विविध कोचिंग क्लासेसमधून ‘अर्ली एड्युकेशन’ या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आणि आपल्या पाल्याला डॉक्टर किंवा इंजिनिअर बनवण्यासाठी पालकही आपल्या मुलांना आठवी किंवा नववीपासूनच या कोचिंग क्लासेसमध्ये पाठवू लागतात. एखादा विद्यार्थी १२वी उत्तीर्ण झाल्यानंतरच इंजिनीअर किंवा डॉक्टर होण्यासाठी घेतलेल्या JEE आणि NEET परीक्षेत बसू शकतो. अशा परिस्थितीत जेव्हा विद्यार्थ्यांना हे देखील समजत नाही की आपल्याला भविष्यात खरोखर डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचे आहे, त्या आधीच हे वियार्थी कोचिंग घेणे सुरू करतात आणि जेव्हा त्यांना कळते की त्यांना खरोखर या क्षेत्रात डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचे आहे. तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल.

आत्महत्येच्या घटनांमध्ये घट होईल :

खरं तर, आजकाल पालक आपल्या मुलांना जेईई आणि एनईईटी कोचिंगसाठी ८ वी किंवा ९ वी पासून पाठवण्यास सुरुवात करतात आणि जेव्हा मुलांना हे समजते की आपण या क्षेत्रात यायचे नव्हते, तेव्हा खूप उशीर झालेला असतो. कारण या परीक्षांची तयारी करताना ते इतके पुढे आले आहेत की आता ते सोडून दुसऱ्या क्षेत्रात जाणे त्यांच्यासाठी कठीण होऊन बसते. तसेच, त्यांच्यावर पालकांचा आणि समाजाचा इतका दबाव असतो की, त्यांना इच्छा असूनही या क्षेत्रातून बाहेर पडता येत नाही आणि यामुळेच दरवर्षी अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आत्महत्या करतता.

आता विद्यार्थी त्यांच्या भविष्याबाबत निर्णय घेणार :

आता असे होणार नाही, कारण केंद्र सरकारकडून कोचिंग सेंटर्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली असून, त्यानुसार आता १६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटर्समध्ये प्रवेश मिळणार नाही. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश दिला जाईल. हा नियम लागू केल्यामुळे, पालकही लहानपणापासूनच त्यांच्या मुलांवर JEE आणि NEET कोचिंगसाठी दबाव आणू शकणार नाहीत. तसेच, सर्वात चांगली गोष्ट अशी असेल की विद्यार्थ्याने १० वी उत्तीर्ण होईपर्यंत त्याला आपले करिअर कोणत्या क्षेत्रात करायचे आहे हे समजेल आणि तो त्या प्रवाहात प्रवेश घेईल. याशिवाय विद्यार्थ्याला जेईई किंवा एनईईटीच्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर लहान वयात त्याच्यावर कोणतेही दडपण येणार नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.