Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
घातक शस्त्रे अवैधरित्या विक्रीकरीता बाळगणा-यास परप्रांतीय ३ इसमांना गुन्हे शाखा युनीट २ ने केले जेरबंद….
अमरावती(प्रतिनिधी) – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी अमरावती शहर यांनी दिलेल्या सुचनेनुसार गुन्हेशाखा युनिट २ चे पथक व पोलिस निरीक्षक, गुन्हेशाखा युनिट-२ यांचे आदेशाने दि. १९/०१/२०२४ रोजी पोलिस आयुक्तालय हद्दीत नाईट पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या माहीती च्या आधारे वडाळी नाका गार्डन अमरावती येथे सापळा रचुन थांबलो असता. चांदुर रेल्वे कडुन वडाळी नाका अमरावती एक संशयीत वाहन येतांना दिसली सदर वाहनास थांबुन वाहनातील तीन इसम नामे
१) जावीद शेख वल्द अनीस शेख वय ३८ वर्ष रा. तेजाळे चौक वडाळा नाका, जुना नाशिक जि. नाशिक,
२)मोहम्मद अरफाद वल्द शेख हुसेन वय ३० वर्ष रा.डि.जे. हल्ली, अरबिक कॉलेज, १२ क्रॉस मोदी रोड, बेंगलोर राज्य-कर्नाटक,
३) अब्दुल अयफाज वल्द अब्दुल अजीज वय २४ वर्ष रा. इमाम नगर, लालखडी, अमरावती
यांना शिताफिने वाहनासह ताब्यात घेवून त्यांचे ताब्यातील वाहनामधुन ७ नग चायना चाकु, लोखंडी खंजीर असे घातक शस्त्रे व गुन्हयात वापरलेले वाहन एक सुझुकी कंपनीची वॅगनार चारचाकी गाडी क्र. एम. एच ०४ – जी. झेड-२०५७ गोल्डन सिल्व्हर रंगाची असा एकुण २,६९,९००/- रूपये चा मुद्देमाल ताब्यात घेवून त्यांचे विरूध्द पो.स्टे. फेजरपुरा येथे अप.क्र. ४८ / २०२४ कलम
४/२५ आर्म अॅक्ट सहकलम १३५ मपोका प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
सदर ची कारवाई पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी ,पोलिस उपायुक्त परीमंडळ – १ . सागर पाटील,सहायक पोलिस आयुक्त गुन्हे शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. राहुल आठवले, गुन्हे शाखा
युनिट क्र. २ अमरावती शहर, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, पोउपनि राजकिरण येवले, संजय वानखडे, पोलिस शिपाई राजेंद्र काळे, जावेद अहेमद, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, एजाज शहा, संग्राम भोजने, नईम बेग, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार, निलेश वंजारी, संदिप खंडारे यांनी केली आहे.