Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सेक्स्टॉर्शन काही थांबेना! मुंबईत दरमहा पाच जणांची फसवणूक, २०२३मध्ये ५७ गुन्ह्यांची नोंद

14

मुंबई : सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती हाच उत्तम उपाय आहे. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असताना सर्वसामान्य नागरिक विशेषतः ज्येष्ठ नागरिक मात्र सायबरचोरांच्या जाळ्यात अडकत आहेत. मुंबईत सन २०२३मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली असता दरमहा सरासरी सुमारे पाच सेक्स्टॉर्शनचे गुन्हे दाखल होत आहेत. अश्लील, मॉर्फिंग केलेले व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळले जातात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सायबरयुगात सावधगिरी बाळगायला हवी.

असे करतात सेक्स्टॉर्शन

– समाजमाध्यमांवर किंवा मोबाइलवर पाठवतात संदेश
– महिला असल्याचे भासविणारी महिला करते ‘हाय, हॅलो’ने सुरुवात
– समाजमाध्यमांवर ओळख झाल्यास प्रथम होते मोबाइल क्रमांकाची मागणी
– मोबाइलवर मधाळ बोलून करतात विश्वास संपादन
– आधी अश्लील संभाषण आणि नंतर अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल
– समोरील व्यक्तीलाही असे करण्यास प्रवृत्त केले जाते
– अश्लील संभाषण आणि व्हिडीओ हे ॲपच्या साह्याने एकत्र केले जातात
– समाजमाध्यमांवर, युट्युबवर अपलोड करण्याची धमकी दिली जाते
– लोन ॲपवरील कर्ज फेडल्यानंतरही हीच पद्धत वापरली जाते
– मॉर्फिंग केलेला अश्लील व्हिडीओ पाठवून धमकावले जाते
– व्हायरल करण्याची भीती दाखवून पैसे उकळतात.
नाशिकमध्ये वर्षभरात सापडले तब्बल ३५२ बेवारस मृतदेह; जिल्हा रुग्णालय चौकीत आकस्मित मृत्यूची नोंद
सायबरमधील अश्लीलतेचे गुन्हे

– मुंबईत सन २०२३मध्ये सेक्स्टॉर्शनचे ५७ गुन्हे दाखल
– केवळ १६ गुन्हे उघडकीस, २६ जणांना अटक
– आक्षेपार्ह एमएमएस, अश्लील पोस्टच्या २४९ गुन्ह्यांची नोंद
– उकल झालेल्या १४५ गुन्ह्यांत १५२ जण अटकेत
– मॉर्फिंग व्हिडीओ आणि छायाचित्रांचे १८३ गुन्हे
– यामध्ये बनावट प्रोफाइल बनवूनही दिशाभूल केल्याचे उघड
– १८३पैकी ७२ गुन्हे उघडकीस आणण्यात यश

हे कायम लक्षात असू द्या

– खासगी छायाचित्रे कुणालाही शेअर करू नका
– समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करताना जपून
– अनोळखी व्यक्तीने केलेले ‘व्हिडीओ कॉल’ स्वीकारू नका
– आकर्षित करण्यासाठी तरुणींच्या चेहऱ्याचा वापर केला जातो
– एखादा ‘न्यूड कॉल’ चुकून स्वीकारला तर अधिक काळ बोलू नका
– लैंगिक छळाचा आरोप, बदनामीची भीती दाखवली जाते
– पैशाची मागणी, खंडणी मागितल्यास आर्थिक व्यवहार करू नका
– छायाचित्र मॉर्फिंग आहे हे लक्षात असू द्या, बदनामीच्या भीतीने खचू नका

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.