Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अनोळखी मृतव्यक्तीची ओळख पटविण्याचे एरंडोल पोलिसांकडून आवाहन

6

जिल्हा संपादक: शैलेश चौधरी
एरंडोल : येथील पोलीस स्टेशन तर्फे एका मृत अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान एरंडोल पोलीस स्टेशन येथे मयत एक अनोळखी पुरुष,वय अंदाजे ५० वर्षे,नाव,गाव पत्ता माहीत नाही.यास दि. २४/७/२०२१ रोजी ग्रामीण रुग्णालय,एरंडोल येथुन उपचारासाठी सिव्हील हॉस्पीटल,जळगाव येथे दाखल केले असता तो फुप्फुस व लिव्हर याचे गंभीर आजारामुळे दि .०३ / ०८ / २०२१ रोजी मयत झालेला असुन त्याचे वर्णन खालीलप्रमाणे रंग सावळा,ऊंची ५.५ फुट, शरीराने सडपातळ, समोर टक्कल पडलेले,नाक सरळ, चेहरा लांबट,दाढी वाढलेली,अंगात पिवळे पट्टे असलेले काळ्या रंगाचे टी शर्ट,तपकिरी रंगाची अंडरपँट.
वरील वर्णनाच्या पुरुषाच्या नातेवाईकांचा व वारसांचा शोध होणेकरीता वरील माहिती असलेल्या व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास त्यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला येऊन ओळख पटविण्याचे आवाहन एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,पोलिस नाईक संदिप सातपुते व अनिल पाटील यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.