Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वनप्लसनं पुन्हा एकदा ग्राहकांना गंडवलं; ‘या’ डिवाइसच्या फिचरमध्ये केला झोल

14

OnePlus नं अधिकृतपणे सांगितलं आहे की कंपनीच्या लेटेस्ट फ्लॅगशिप फोन OnePlus 12R च्या 256 GB व्हेरिएंटमध्ये देखील UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे, याआधी दावा करण्यात आला होता की फोनमध्ये UFS 4.0 स्टोरेज आहे. अनेक युजर्सनी वनप्लस १२आरचा रीड आणि राइट स्पीड कमी असल्याची तक्रार केल्यानंतर कंपनीनं कंफर्म केलं आहे की वनप्लस १२आरच्या दोन्ही व्हेरिएंटमध्ये यूएफएस ३.१ स्टोरेज देण्यात आली आहे. अद्याप कंपनीनं त्या ग्राहकांसाठी नुकसान भरपाईची घोषणा केली नाही, ज्यांनी यूएफएस ४.० चा विचार करून हा फोन विकत घेतला होता.

एका कम्युनिटी पोस्टमध्ये कंपनीचे सीओओ आणि प्रेजिडेन्ट किंडर लियू यांनी म्हटलं आहे की, “एका चुकीमुळे, आम्ही असं म्हटलं होतं की ट्रिनिटी इंजिननं एन्हान्स होणारी स्टोरेज काही व्हेरिएंटमध्ये यूएफएस ४.० असेल. आता मी कंफर्म करत आहे की वनप्लस १२आरच्या सर्व स्टोरेज व्हेरिएंटमध्ये ट्रिनिटी इंजिननं एन्हान्स केलेली यूएफएस ३.१ स्टोरेज आहे.”

खुलासा कसा झाला?

या सर्व प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा काही युजर्सनी वनप्लस १२आर आणि वनप्लस १२ च्या स्टोरेज परफॉर्मन्सची तुलना करण्यास सुरुवात केली. या टेस्टमध्ये वनप्लस १२आर चा स्कोर वनप्लस १२ पेक्षा खूप कमी येत होता, तेही दोन्ही डिव्हाइसमध्ये एकाच प्रकारची स्टोरेज असून देखील. युजर्सनी ही माहिती फेसबुक आणि एक्स सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेयर केली.

OnePlus नं देखील लाँचच्या वेळी सांगितले होते की वनप्लस १२आरच्या २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये यूएफएस ४.० स्टोरेज दिली जाईल जी यूएफएस ३.१ च्या तुलनेत खूप फास्ट, पावर एफिशिएन्ट आणि महाग आहे. एक्सवरील पोस्ट वायरल होऊ लागल्यानंतर कंपनीनं स्पष्टीकरण दिलं की १२८जीबी आणि २५६जीबी अश्या वनप्लस १२आरच्या दोन्ही मॉडेलमध्ये यूएफएस ३.१ स्टोरेजचा वापर करण्यात आला आहे.

काय फरक पडतो?

यूएफएस ४.० स्टोरेज असलेल्या फोनची परफॉर्मन्स थोडी चांगली असते, खासकरून रीड स्पीड आणि राइट स्पीडच्या बाबतीत. तसेच यूएफएस ४.० स्टोरेज असलेला फोन यूएफएस ३.१ स्टोरेज असलेल्या फोनच्या तुलनेत जास्त फास्ट अ‍ॅप ओपन करू शकतो. परंतु हा फरक खूप कमी लोकांच्या ध्यानात येतो. अनेक फ्लॅगशिप फोनमध्ये यूएफएस स्टोरेजचा वापर केला जातो, तर बजेट फोन्समध्ये eMMC स्टोरेज देण्यात येते. अमेरिकन प्रीमियम मोबाइल निर्माता अ‍ॅप्पल मात्र आयफोन्समध्ये जास्त महाग NVMe स्टोरेज वापरते, जी बऱ्याचदा कम्प्युटर्समध्ये वापरली जाते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.