Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आर्थिक राशिभविष्य 23 फेब्रुवारी 2024 : या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार, मान-सन्मान वाढणार, तुमची राशी काय सांगते? पाहा राशिभविष्य

10

Career Rashibhavishya, 23 फेब्रुवारी 2024 : मेष, वृषभ, कर्क तुळ यांच्यासाठी दिवस उत्तम असून रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. मिथुन आणि कन्या राशीने संर्घषापासून दूर रहावे. तुमच्या राशीत शुक्रवारसाठी काय लिहिले आहे. मेष ते मीन राशीपर्यंत शुक्रवारचा दिवस आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने कसा जाईल ते पाहूया.

मेष आर्थिक राशिभविष्य : आत्मसन्मान वाढेल

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा पूर्ण दिवस हा धावपळीत जाईल आणि तुम्ही आज दिवसभर एखाद्या कार्यक्रमाचा नियोजनात व्यग्र राहाल. आजच्या दिवशी भौतिक आणि संसारिक विषयांकडे पाहाण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता आहे. आज सावध राहून कामे पूर्ण करा अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. आज तुमचा आत्मसन्मान वाढेल आणि पैशाशी संबंधित योजना यशस्वी होतील.
PC:freepik.com

वृषभ आर्थिक राशिभविष्य : व्यवसायात नफा होईल

वृषभ आर्थिक राशिभविष्य : व्यवसायात नफा होईल

वृषभ राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल आणि तुमच्या मानसन्मानात आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. आजचा दिवस तुम्हाला उत्तम प्रकारे धनसंपतीचा दायक ठरेल. तुम्हाला व्यवसायात नवीन सहकारी मिळतील आणि व्यवसायातून तुम्हाला नफा होईल. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि पैशाशी संबंधित योजना पूर्ण होतील. आज भाग्यात वृद्धी होईल.
PC:freepik.com

मिथुन आर्थिक राशिभविष्य : करिअरचे निर्णय सांभाळून घ्या

मिथुन आर्थिक राशिभविष्य : करिअरचे निर्णय सांभाळून घ्या

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. आजचा दिवस धावपळीचा राहील आणि एखादी विशेष चिंता सतावेल. पत्नीच्या आरोग्याबद्दल सावध राहा. घरी पाहुणे आल्याने तुमचे काम वाढू शकते आणि तुमचे पैसेही जास्त खर्च होतील. करिअरशी संबंधित कोणाताही निर्णय अतिशय सांभाळून घ्यावा.
PC:freepik.com

कर्क आर्थिक राशिभविष्य : रखडलेली कामे पूर्ण करा

कर्क आर्थिक राशिभविष्य : रखडलेली कामे पूर्ण करा

कर्क राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल आणि तुम्हाला उत्तम संपत्तीची प्राप्ती होईल. आज काही आवश्यक खर्च होतील. संततीकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल आणि त्यामुळे कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील. बऱ्याच दिवसांपासून रखडलेले एखादे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. धनसन्मानात वृद्धी होईल.
PC:freepik.com

सिंह आर्थिक राशिभविष्य : जबाबदाऱ्या पूर्ण कराल

सिंह आर्थिक राशिभविष्य : जबाबदाऱ्या पूर्ण कराल

सिंह राशीच्या लोकांना नशिब साथ देईल आणि आज भाग्यात वृद्धी होईल. बुध ग्रह तुमच्या बाजूने असल्याने कार्यस्थळातील बदल तुमच्यासाठी चांगले वळण घेतील. व्यापारात जवळच्या सहकाऱ्यांप्रति निष्ठा आणि चांगले बोलणे यामुळे तुम्ही लोकांचे मन जिंकून घ्याल. तुमच्या सन्मानात वृद्धी होईल आणि तुमच्या योजना यशस्वी होतील. तुम्हा तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल.
PC:freepik.com

कन्या आर्थिक राशिभविष्य : वाद, संघर्षापासून दूर राहा

कन्या आर्थिक राशिभविष्य : वाद, संघर्षापासून दूर राहा

कन्या राशीच्या लोकांना नशिब साथ देईल. आज तुमच्या योजना यशस्वी होतील आणि धन, मानसन्मानात वृद्धी होईल. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात शांतपणे काम करावे लागेल. वाद आणि संघर्ष यापासून दूर राहा. आज कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा. तुम्हाला कामाच्या ठिकाणी जास्तीची जबाबदारी पार पाडावी लागेल. आज तुमच्या सन्मानात वाढ होईल.
PC:freepik.com

तुळ आर्थिक राशिभविष्य : रखडलेली कामे मार्गी लागतील

तुळ आर्थिक राशिभविष्य : रखडलेली कामे मार्गी लागतील

तुळ राशीच्या लोकांसाठी आज मान सन्मानात वृद्धी होईल, पराक्रमात वाढ झाल्याने तुम्हाला आनंद होईल. आजचा दिवस आनंदात जाईल. सौंदर्य निखरले. जवळच्या मित्राच्या सल्ल्यामुळे आणि सहकार्यामुळे बिघडलेली कामेही नीट होऊ शकतील, तसेच तुम्ही आज वेळेचा फायदा घेतला पाहिजे. आज पैशाच्या बाबतीत नशिब साथ देईल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील.
PC:freepik.com

वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : कामात सुधारणांची संधी

वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : कामात सुधारणांची संधी

वृश्चिक राशीसाठी आज भाग्यवृद्धीचा दिवस आहे, तसेच आजचा दिवस सुखात जाईल. तुम्हाला तुमच्या कामात सुधारणा करण्याची संधी मिळेल आणि तुमच्या योजना यशस्वी होतील. एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला तुम्हाला भविष्यात उपयोगी पडणार पडणार आहे. तुमचे आनंदाचे आणि मौजमजेचे दिवस सुरू होणार आहेत. आज सुखसुविधांत वृद्धी होईल आणि कामे यशस्वी होतील.
PC:freepik.com

धनू आर्थिक राशिभविष्य : गुंतवणुकीतून लाभ

धनू आर्थिक राशिभविष्य : गुंतवणुकीतून लाभ

धनू राशीच्या लोकांसाठी पैशांशी संबंधित योजना यशस्वी होतील. पैशाच्या गुंतवणुकीतून लाभ होईल. तुम्हाला अचानक मोठ्या प्रमाणावर पैसा मिळेल, त्यामुळे धनसंचयात लाभ होईल. आज स्वतःच्या हिंमतीवर समस्यांवर उपाय योजावेत, त्यामुळे तुम्हाला स्थायी स्वरूपाचे यश मिळेल. धनवृद्धी होईल.
PC:freepik.com

मकर आर्थिक राशिफल : कामात व्यग्र राहाल

मकर आर्थिक राशिफल : कामात व्यग्र राहाल

मकर राशीच्या लोकांसाठी अधिक व्यग्र राहतील असे संकेत आहेत. व्यापार आणि व्यवसायाकडे लक्ष देण्याला तुमचे प्राधान्य असले पाहिजे. आज दुपारपर्यंत तुमचे कामाचे नीट नियोजन लावून घ्यावे, कारण पुढे वेळ न मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या भाग्यात वृद्धी होईल आणि पैशाशी संबंधित योजना यशस्वी होतील.

PC:freepik.com

कुंभ आर्थिक राशिफल : कुटुंबासाठी जास्त खर्च होईल

कुंभ आर्थिक राशिफल : कुटुंबासाठी जास्त खर्च होईल

कुंभ राशीच्या लोकांसाठी भाग्यात वृद्धी होईल. तसेच धन आणि कीर्तीमध्येही वाढ होईल. पण तुम्हाला शत्रूंकडून मोठे आव्हान मिळू शकते. पण शेवटी विजय आणि यशप्राप्ती झाल्याने आनंदाचे वातावरण राहील आणि मंगलमय परिवर्तन होतील. आज कुटुंबासाठी जास्त खर्च करावा लागू शकतो. आज धनवृद्धी होईल.
PC:freepik.com

मीन आर्थिक राशिफल : जवळचा प्रवास घडेल

मीन आर्थिक राशिफल : जवळचा प्रवास घडेल

मीन राशीच्या लोकांच्या सन्मानात वृद्धी होईल आणि तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. घरगुतीपातळीवर एखादे मंगलकार्य होईल आणि त्यातून धनप्राप्ती होईल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. आज एखादा जवळचा प्रवास घडू शकतो. रात्रीचा काही वेळ कुटुंबाला दिला तर चांगले होईल. तुमच्या योजना यशस्वी होतील.
PC:freepik.com

अनिता किंदळेकर यांच्याविषयी

अनिता किंदळेकर
अनिता किंदळेकर

अनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.… Read More

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.