Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Honor MagicBook होणार एप्रिलमध्ये लॉन्च
‘Honor’ चा नवा लॅपटॉप भारतात लवकरच लॉन्च होणार आहे. त्याचे नाव ‘Honor MagicBook’ असे असेल. सध्या, Honor Magic Book ची लाँचिंग तारीख समोर आलेली नाही. पण त्याआधीच लॅपटॉपचे फीचर्स लीक झाले आहेत. कंपनीने पुष्टी केली आहे की ती लवकरच ‘MagicBook X14 Pro (2024)’ आणि ‘X16 Pro (2024)’ लाँच करेल.
25 मार्चपासून प्री-बुकिंग सुरू
रिपोर्टनुसार, हे मॅजिकबुक लॅपटॉप एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च केले जाऊ शकतात. ऑनरने लॉन्च तारखेबाबत अजून कोणतीही पुष्टी केलेली नाही. लीक झालेल्या रिपोर्टवर विश्वास ठेवला तर हे दोन्ही लॅपटॉप भारतात 60 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च केले जाऊ शकतात. तसेच लॅपटॉपच्या खरेदीवर उत्तम ऑफर्स दिल्या जात आहेत. लॅपटॉप 25 मार्च 2024 पासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून दिला जाईल.
संचालक CP खंडेलवाल यांची X वर पोस्ट
‘HTech India’ चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक CP खंडेलवाल यांनी X वर पोस्ट केले की , “HONOR कडून नवीनतम लॅपटॉप सादर करत आहोत! i5 13th Gen “H Series” प्रगत प्रोसेसर आणि मल्टी-स्क्रीन यांच्या कोलॅब्रेशनसाठी मी एक्साईटेड आहे.”
‘Honor MagicBook’ चे फीचर्स
‘Honor’ चा आगामी लॅपटॉप ‘Intel Core i5’ H-सीरीज CPU द्वारे सपोर्टेड असेल.
हा लॅपटॉप 16 GB रॅम आणि 512 GB स्टोअरेजसह येईल.
या लॅपटॉप्समध्ये ‘विंडोज 11 होम’ प्री-इंस्टॉल केलेले आहे आणि प्रो व्हेरियंटमध्ये एआय-चालित नॉइज कॅन्सलेशन प्रदान केले जाईल.
याशिवाय हाय-रिझोल्यूशन स्टीरिओ स्पीकर्ससाठी यात सपोर्ट उपलब्ध असेल.
लॅपटॉपमध्ये पूर्ण आकाराचा बॅकलिट कीबोर्ड दिला जाईल.
बॅटरी आयुष्य
जर आपण बॅटरी लाइफबद्दल बोललो तर, लॅपटॉपची बॅटरी 10 तासांची असणे अपेक्षित आहे. ‘Honor MagicBook’ ची बॅटरी 11.5 तासांपर्यंत लोकल व्हिडिओ प्लेबॅकसह नॉन-स्टॉप प्रॉडक्टिव्हिटीसाठी ती 60Wh एवढया मोठ्या क्षमतेच्या बॅटरीद्वारे सपोर्टेड असेल.