Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- परमबीर सिंग यांच्याविरोधात आणखी एक खुली चौकशी.
- पोलीस निरीक्षक घाडगे यांच्या तक्रारीची होणार चौकशी.
- राज्य सरकारकडून एसीबीला मिळाला हिरवा कंदील.
वाचा: CM ठाकरे-अमित शहा यांची दिल्लीत होणार भेट!; तर्कवितर्कांना उधाण
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून परमबीर यांच्या विरोधात आधीच एका प्रकरणात खुली चौकशी सुरू आहे. पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांच्या आरोपावरून ही चौकशी केली जात आहे. निलंबित डांगे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी परमबीर यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणाची खुली चौकशी सुरू असतानाच पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना पत्र लिहून भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी मागणी केली होती. याबाबत प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्याने सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला खुली चौकशी करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर यांच्याविरोधात कट रचणे, पुरावे नष्ट करणे, आणि अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा: किरीट सोमय्यांवरील कारवाई नक्की कुणाच्या आदेशाने?; वळसे म्हणाले…