Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आर्थिक राशिभविष्य 12 एप्रिल 2024: या राशींचे कार्य संपन्न होणार, प्रवासात शुभलाभाची शक्यता ! पाहा, तुमचे राशिभविष्य
मेष आर्थिक राशिभविष्य – सन्मानात वृद्धी होईल
मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि तुमच्या सन्मानात वृद्धी होईल. तुमच्या अधिकाऱ्यांशी बोलताना भाषा गोड ठेवा, त्यातून तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. एखादे रखडलेले काम मार्गी लागेल. रात्रीचा वेळ नातेवाईकांसोबत चांगला जाईल, आणि तुम्हाला लाभ होईल. काही आवश्यक कामानिमित्त बाहेर जावे लागू शकते.
वृषभ आर्थिक राशिभविष्य : राजकीय क्षेत्रात यश
वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस समाधान आणि शांतीचा आहे. तुम्ही राजकीय दिशेने प्रयत्न कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. ओळखींचा उपयोग सरकारी कामात होईल. नवीन संबंधातून पद, प्रतिष्ठा यात वृद्धी होईल आणि तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. रात्री काही कारणांमुळे अनावश्यक तणाव वाढेल. संततीकडून दिलासा मिळेल.
मिथुन आर्थिक राशिभविष्य : रखडलेली कामे मार्गी लागतील
मिथुन राशीच्या लोकांना आज प्रत्येक विषयात सावध राहून पावले टाकायची आहेत. मुलांना शिक्षण, स्पर्धा यात यश मिळेल आणि तुम्हाला आनंद होईल. सायंकाळच्या वेळी रखडलेली कामे पूर्ण होतील. रात्री काही उत्साहवर्धक आणि मंगलकार्यात सहभागी होण्याचे संधी मिळेल. धनवृद्धी होईल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील.
कर्क आर्थिक राशिभविष्य : सुखद वार्ता मिळले
कर्क राशीच्या लोकांना नशिब साथ देत आहे आणि आज तुम्हाला उत्तम संपत्तीची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत. तुमची धनवृद्धी होईल आणि रोजगाराच्या क्षेत्रात सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येईल. तुमच्या मानसन्मानात आणि प्रतिष्ठेत भर पडेल. संततीप्रति दायित्वाची पूर्तता होईल. आकस्मिक एखाद्या प्रवासाला जावे लागेल आणि त्यात तुम्हाला लाभ होईल. सायंकाळी प्रिय व्यक्तीचे दर्शन होईल आणि सुखद वार्ता मिळाल्याने आनंद होईल.
सिंह आर्थिक राशिभविष्य : स्पर्धेच्या क्षेत्रात विशेष यश
सिंह राशीसाठी आज ग्रहदशा शुभ आहे आणि तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. तुमची भाषा सौम्य आहे, त्यामुळे तुम्हाला सन्मान मिळेल आणि आर्थिक लाभही होईल. तुम्हाला शिक्षण, स्पर्धेच्या क्षेत्रात विशेष यश मिळेल. आज काही आजारपणामुळे तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. तुमचे विरोधक तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत.
कन्या आर्थिक राशिभविष्य : कार्य संपन्न होतील
कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस लाभपूर्ण आहे आणि तुमच्या सुखसुविधांत वाढ होईल. तुम्ही न कल्पना केलेले यश तुम्हाला मिळेल. संततीकडून समाधानाची आणि आनंदाची बातमी मिळेल. दुपारनंतर एखाद्या कायदेशीर वादात यश मिळाल्याने ते आनंदाचे कारण राहील. शुभ खर्च होईल आणि कीर्ती वाढेल. तुमची धनवृद्धी होईल आणि कार्य संपन्न होतील.
तूळ आर्थिक राशिभविष्य : कामानिमित्त प्रवास
तूळ राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल आणि तुमच्या आजूबाजूला वातावरण चांगले राहील. कुटुंबातील सर्व सदस्यांचा आनंद वाढेल आणि तुमच्या जीवनात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली देवाणघेवाणीची समस्या सुटेल. पुरेशा प्रमाणात पैसे हाती आल्याने सुख मिळेल. विरोधकांचा अंत होईल आणि तुम्ही तुमच्या मनानुसार काम करू शकाल. कामानिमित्त तुम्हाला दूरचा किंवा जवळचा प्रवास करावा लागू शकतो.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : डॉक्टरांकडे जावे लागेल
वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि तुम्हाला व्यापारात लाभ होईल. धन आणि मानसन्मानात वृद्धी होईल आणि तुमची कामे पूर्ण होतील. एखाद्या चांगल्या डॉक्टराचा सल्ला आवश्य घ्यावा. आज तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागू शकते. पैशाशी संबंधित योजना पूर्ण होतील आणि कोठू तरी पैसे तुमच्या हाती येतील.
धनू आर्थिक राशिभविष्य : विरोधकही स्तुती करतील
धनू राशीच्या लोकांना आज लाभ होईल आणि विरोधकही तुमची स्तुती करतील. तुम्हाला सरकारी विभागातून लाभ होईल. सासरच्या बाजूने पुरेशा प्रमाणात पैसे हाती येतील. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत शुभ योग बनतील आणि तुम्हाला लाभ होईल. सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेण्याची संधी मिळेल आणि धनवृद्धी होईल.
मकर आर्थिक राशिभविष्य : आईवडिलांकडे विशेष लक्ष द्या
मकर राशीच्या लोकांना आज आर्थिक क्षेत्रात यश मिळेल. रोजगाराच्या क्षेत्रात सुरू असलेल्या नव्या प्रयत्नांना यश मिळेल. तुमच्या सोबत काम करणारे लोक तुमची स्तुती करतील आणि तुमच्यासोबत त्यांचा चांगला ताळमेळ राहील. आदर आणि सहकार्य मिळेल. सायंकाळच्या वेळी भांडण किंवा वादात पडू नका. रात्री आवडत्या पाहुण्यांचे स्वागत करण्याचे योग आहेत. आईवडिलांकडे विशेष लक्ष द्या.
कुंभ आर्थिक राशिभविष्य : वादविवादांपासून दूर राहा
कुंभ राशीच्या लोकांना लाभ होईल आणि धनवृद्धीही होईल. शनी मार्गी चालत आहे. वाद होऊ शकतात आणि शत्रूंचा त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या बुद्धीने केलेल्या कामात नुकसान होऊ शकते, आणि त्यामुळे निराश व्हाल. एखादी विपरित बातमी कानावर येईल आणि तुम्हाला प्रवासाला जावे लागू शकते. त्यामुळे सावध राहा आणि वादविवादांपासून दूर राहा.
मीन आर्थिक राशिभविष्य : पैसे उधार देऊ नका
मीन राशीच्या लोकांना आज लाभ होईल. तुमच्या कामातील अडथळे दूर होतील. मेहुणा, दीर यांच्याशी देवाणघेवाण करू नका, नातेसंबंध बिघडण्याचा धोका आहे. धार्मिक स्थळाचा प्रवास घडेल आणि पूर्ण कार्यावर पैसे खर्च होतील. प्रवासात सावध राहा. एखाद्या मौल्यवान गोष्टींची चोरी होऊ शकते. कोणालाही पैसे उधार देऊ नका.