Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हे फीचर लोकांच्या फोटो मधील ठराविक भाग एडिट करण्यास मदत करण्यासाठी जेनरेटिव एआयसह एआय टेक्नॉलॉजीच्या कॉम्बीनेशनचा वापर करतं – जसे की ऑब्जेक्ट व्यवस्थित करणे, आकाशाचा रंग किंवा फोटो बॅकग्राउंड बदलणे आणि फोटोमध्ये गॅप भरणे. हे फीचर पहिल्यांदा मे २०२३ मध्ये Google I/O मध्ये सादर करण्यात आले होते आणि सध्या फक्त Pixel 8 आणि Pixel 8 Pro स्मार्टफोन मध्ये उपलब्ध आहेत. पंरतु गुगलच्या घोषणेमुळे, मॅजिक एडिटर सर्व पिक्सेल स्मार्टफोनसाठी उपलब्ध होईल.
खरेदी करावा लागेल Google One प्लॅन
अँड्रॉइड आणि आयओएसवर सर्व गुगल फोटो युजर्सना प्रत्येक महिन्याला १० मॅजिक एडिटर सेव्ह देखील मिळतील. त्यापेक्षा जास्त वापर करण्यासाठी लोकांना प्रीमियम Google One प्लॅन खरेदी करावा लागेल. गुगलनं म्हटलं आहे की हे फीचर त्या डिवाइसेस वर उपलब्ध होईल ज्यात कमीत कमी 3GB रॅम आहे आणि Android 8/iOS 15 वरचे सॉफ्टवेयर व्हर्जन आहेत. हे फीचर पिक्सेल टॅबलेट युजर्ससाठी देखील उपलब्ध होईल.
Magic Eraser युजर्सना फोटोज मध्ये असलेल्या अनावश्यक वस्तूंना काढून टाकण्यास मदत करतो जसे की बॅकग्राउंड मधील लोक आणि विजेच्या तारा आणि विजेचे खांब. पहिल्यांदा ऑक्टोबर २०२१ मध्ये सादर करण्यात आलेले हे फीचर फेब्रुवारी २०२३ मध्ये अँड्रॉइड आणि आयओएसवर सर्व पिक्सेल स्मार्टफोन युजर्स आणि Google One मेंबर्ससाठी सादर करण्यात आलं होतं.
एआय एडिटिंग फीचर्स जसे की ब्लर फोटोज सुधारण्यासाठी फोटो अनब्लर, पोर्ट्रेट लाइट जी युजर्सना कॅप्चर केल्यानंतर पोर्ट्रेट फोटोमध्ये लाइट नीट करणे आणि ब्राइटनेस अॅडजस्ट करू देते, फोटो आणि व्हिडीओसाठी एचडीआर इफेक्ट, कलर पॉप आणि पर्सनलाइज्ड, शेयरेबल कोलाज बनवण्यासाठी नवीन स्टाइल्स, युजर्सना दिले जात आहेत. सिनेमॅटिक फोटो, पोर्ट्रेट ब्लर, स्काय सजेशन आणि व्हिडीओ इफेक्ट्स सारखे फीचर्स देखील उपलब्ध आहेत. गुगलने म्हटलं आहे की हे फीचर्स १५ मे पासून युजर्ससाठी रोल आउट होण्यास सुरुवात होईल आणि येत्या महिन्यात उपलब्ध होतील.