Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तब्बल १४ हजारांच्या डिस्काउंटसह iPhone 15 उपलब्ध; पुन्हा मिळणार नाही अशी जबरदस्त ऑफर

31

iPhone 15 भारतात सप्टेंबर २०२३ मध्ये iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मॉडेलसह लाँच करण्यात आला होता. बेस iPhone 15 सीरीज मॉडेलमध्ये तीन स्टोरेज ऑप्शन मिळतात – १२८जीबी, २५६जीबी आणि ५१२जीबी. फोन Apple च्या ए१६ बायोनिक चिपसेटवर चालतो आणि दमदार कॅमेरा सिस्टमसह आला आहे. जर तुम्ही देखील हा फोन खरेदी करू इच्छित असाल तर एक संधी चालून आली आहे. Flipkart तुम्हाला या स्मार्टफोनवर सर्वात चांगली डील देत आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर फोनच्या किंमतीत जबरदस्त डिस्काउंट देत आहे आणि त्याचबरोबर बँक ऑफर्स आणि No-Cost EMI सारखे एक्स्ट्रा बेनफिटि्स देखील आहेत.

ब्लॅक, ब्लू, ग्रीन, पिंक आणि येलो कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आलेला iPhone 15 चा बेस मॉडेल भारतात ७९,९९० रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. तर २५६जीबी आणि ५१२GB व्हर्जनची किंमत लाँचच्या वेळी अनुक्रमे ८९,९०० रुपये आणि १,०९,९०० रुपये होती. सध्या, iPhone 15 च्या १२८जीबी आणि २५६जीबी स्टोरेज ऑप्शन Flipkart वर १३,९९१ रुपयांच्या डिस्काउंटसह अनुक्रमे ६५,९९९ रुपये आणि ७५,९९९ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. तसेच, ५१२जीबी स्टोरेज ऑप्शन ९५,९९९ रुपयांमध्ये लिस्टेड आहे.

डिस्काउंटसह ग्राहक Flipkart Axis Bankच्या माध्यमातून या खरेदीवर (Non-EMI ट्रँजॅक्शन) वर ५% फ्लॅट कॅशबॅक मिळवू शकतात. तसेच, Citi-ब्रँडेड क्रेडिट कार्ड EMI ट्रँजॅक्शनवर १,५०० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. जर तुम्ही iPhone 15 UPIच्या माध्यमातून खरेदी केला तर तुम्हाला ७५० रुपयांचा डिस्काउंट मिळेल. विशेष म्हणजे Flipkart सिक्योर्ड पॅकेजिंगच्या नावावर iPhone 15 च्या सर्व व्हेरिएंट्सवर ९९ रुपयांची एक्स्ट्रा फी मिळते.

iPhone 15 specifications

iPhone 15 मॉडेलमध्ये ६.१-इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे ज्यात २,००० निट्स पर्यंतचा पीक ब्राइटनेस लेव्हल आणि सिरॅमिक शील्ड प्रोटेक्शन आहे. हा मॉडेल डायनॅमिक आयलंड फीचर आणि धूळ आणि पाणी प्रतिरोधसाठी आयपी६८ रेटिंगसह येतो. फोन ए१६ बायोनिक चिपसेटवर चालतो.

iPhone 15 च्या ड्युअल रियर कॅमेरा सिस्टममध्ये अल्ट्रा-वाइड लेन्ससह १२-मेगापिक्सल सेन्सर आणि ४८-मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा मिळतो. फ्रंट कॅमेरा देखील १२-मेगापिक्सल सेन्सर आहे. दावा करण्यात आला आहे की हँडसेट २६ तासांपर्यंतचा व्हिडीओ प्लेबॅक टाइम देऊ शकते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.