Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
काय आहे दावा?
व्हायरल व्हिडिओ ४२ सेकंदाचा आहे, ज्यात रणवीर सिंह असं बोलताना दिसतोय, की ‘मोदीजींचा उद्देश हाच आहे, की आपले दयनीय जीवन, बेरोजगारी आणि महागाई साजरी करणे. कारण भारत आता इतक्या वेगाने अन्यायाच्या युगाकडे वाटचाल करत आहे. पण आपण आपला विकास आणि न्याय मागायला विसरू नये. त्यामुळे विचार करून मतदान करा.’
व्हायरल व्हिडिओ एक्सवर अनेक व्हेरिफाईड अकाऊंट्सवरुन शेअर करण्यात आला आहे. अर्काइव पोस्ट इथे पाहता येईल.
व्हायरल दाव्याच्या इतर पोस्ट इथे आणि इथे पाहा.
काय आहे सत्य?
Newschecker ने सर्वात आधी व्हायरल व्हिडिओच्या कीफ्रेमच्या मदतीने रिव्हर्स इमेज सर्च केली. यावेळी न्यूज एजेन्सी एएनआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन १४ एप्रिल २०२४ रोजी शेअर केलेली पोस्ट आढळून आली. यात बॉलिवूड सेलिब्रिटी क्रिती सेनन, रणवीर सिंह आणि मनिष मल्होत्रा यांच्या वाराणसी दौऱ्यातील दृष्य सामील आहेत.
यातच रणवीर सिंहने न्यूज एजेन्सी एएनआयला दिलेली मुलाखतदेखील आहे. यातील दृष्य व्हायरल व्हिडिओतील दृष्यांशी जुळलेले दिसतात.
जवळपास २ मिनिटं ३३ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये वाराणसीतील आपल्या अनुभवांवर प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देताना रणवीर सिंहने सांगितलं, की ‘आज मला असा अनुभव आलाय, जो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आयुष्यभर मी शिवजींचा भक्त आहे आणि पहिल्यांदा काशी दर्शनासाठी आलो आहे. पुढील वेळी मी माझ्या आईला, धर्मपत्नीला घेऊन येईल. ज्यावेळी आम्ही काशी मंदिरात गेलो, तिथे वेगळीच एक उर्जा होती. वेगळेच व्हायब्रेशन होते. ज्यावेळी गुरुजी मंत्र म्हणत होते, आरती सुरू होती, त्यावेळी वेगळीच उर्जा होती. शरीरात उर्जा निर्माण होते. ही उर्जा शरीरात जाणवते. मंदिरात असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक असते. प्रत्येकजण हात वर करुन हर हर महादेव बोलत असतो.’
याच व्हिडिओमध्ये रणवीरने पुढे म्हटलेलं, ‘हा मोदीजींचा उद्देश होता. हे पाहून मला खूप आनंद झाला. समृद्ध सांस्कृतिक वारसा साजरा करणे हा त्यांचा उद्देश होता. आपला इतिहास, आपला वारसा, कारण आपला भारत आता आधुनिकतेकडे वाटचाल करत आहोत. आपण इतक्या वेगाने पुढे जात आहोत, पण आपण आपली पाळंमुळं आणि आपला सांस्कृतिक वारसा कधीही विसरता कामा नये. त्यामुळे विकास, वारसा आणि तोच भूत, वर्तमान आणि भविष्य. हे भूतकाळ आणि भविष्याचं मिश्रण आहे. काशी इतिहासापेक्षा जुनी आहे, परंपरेपेक्षा जुनी आहे, त्यामुळे अशा ठिकाणी होणारा विकास पहा. पुढे तो इंग्रजीत म्हणतो, हे ठिकाण भूतकाळ आणि वर्तमान एकत्र अनुभवते.’
व्हिडिओच्या पडताळणी दरम्यान एएनआयच्या यूट्यूब अकाऊंटवरुन १४ एप्रिल २०२४ रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ मिळाला. या व्हिडिओमध्ये जवळपास १ मिनिट १५ सेकंदापासून रणवीरचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्येही रणवीर वर दिलेलं म्हणत असल्याचं पाहायला मिळतंय.
त्यामुळे तपासात हा व्हिडिओ एडिटेड असल्याचं समोर आलं आहे. खऱ्या व्हिडिओतील मोदीजींचा उद्देश या वाक्यापासूनचा पुढील भाग एडिट करण्यात आला आहे आणि दुसरेच शब्द जोडण्यात आले आहे.
तपासादरम्यान काही न्यूज रिपोर्ट्स मिळाले. ज्यात रणवीर आणि क्रिती रविवारी १४ एप्रिल रोजी वाराणसीमध्ये पोहोचले असल्याचं समजतंय. यावेळी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात पूजा केली. त्याशिवाय ते इंडियन मायनॉरिटी फाऊंडेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘धरोहर काशी की’ या इव्हेंटमध्ये ते पोहोचले होते. या दोघांसह फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राही होता.
निष्कर्ष
न्यूजचेकरच्या तपासात मिळालेल्या पुराव्यांनुसार रणवीरचा व्हायरल व्हिडिओ एटिटेड आहे. खऱ्या व्हिडिओत रणवीर सिंहने पंतप्रधान मोदी आणि काशीची प्रशंसा केली होती.
(This story was originally published by newschecker, and republished by MT as part of the Shakti Collective.)