Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नाव घेताच लागेल कॉल! अँड्रॉइड आणि आयफोनवरील ही ट्रिक तुम्हाला माहित आहे का?

10

काम पटकन व्हावं असं कोणाला वाटत नाही आणि अश्यावेळी स्मार्टफोनमध्ये शॉर्टकट्सची मदत घेतली जाते. अनेक लोक असे असतात जे यासाठी शॉर्टकट अ‍ॅपचा वापर करता. शॉर्टकट अ‍ॅप्स मध्ये व्हॉइस डायलिंग सारखे फीचर्सचा समावेश असतो त्यामुळे कोणताही फोन नंबर शोधावा लागत नाही. तुम्ही बोलून तो नंबर सहज डायल करू शकता आणि कमांड देऊन त्यावर कॉल करू शकता. यासाठी तुम्हाला फोनला हात लावण्याची देखील गरज नाही.

परंतु असे अ‍ॅप तुमच्या प्रायव्हसी आणि फोनसाठी सुरक्षित आहेत का? हा एक मोठा प्रश्न आहे, याचा मात्र अनेकजण विचार करत नाहीत आणि जेव्हा पर्सनल डेटा चोरी होतो तेव्हा डोक्याला हात लावतात. त्यामुळे असे अ‍ॅप इंस्टॉल करण्यापूर्वी हजार वेळा विचार केला पाहिजे.

नाव घेताच लागेल फोन कॉल!

गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवर अनेक असे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत ज्यांचा वापर केल्याने तुमचं काम पटकन होईल आणि वेळ वाचेल. परंतु हे अ‍ॅप तुमच्या संपूर्ण कॉन्टॅक्ट लिस्टसह गॅलरीचा देखील अ‍ॅक्सेस मिळवतात. म्हणजे तुमच्या पर्सनल फोटोसह कॉन्टॅक्ट लिस्ट देखील थर्ड पार्टी अ‍ॅपच्या हाती जाते. यांचा थेट परिणाम प्रायव्हसीवर होतो. फक्त काही मिनिटे वाचवण्यासाठी तुम्ही तुमची प्रायव्हसी थर्ड पार्टी अ‍ॅपच्या हाती गमावता, त्यामुळे डेटा चोरीची शक्यता वाढत .

जर तुम्हाला फोन आवाजाने कंट्रोल करायचा असेल तर अँड्रॉइड आणि अ‍ॅप्पल डिव्हाइसमध्ये मिळणाऱ्या गुगल असिस्टंट आणि सीरी फीचर्सचा वापर करता येईल. या फीचर्सच्या माध्यमातून तुमचा डेटा लीक होण्याची शक्यता नाही आणि आणि तुम्ही सुरक्षित राहता.

अँड्रॉइडवर Google Assistant

यासाठी सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनचं पावर बटन प्रेस करा. Google Assistant पावर बटननं ओपन होतं. त्यानंतर स्क्रीनवर Google Assistant दिसू लागेल, आता तुम्ही गुगल असिस्टंटला गुगल हाक मारून देखील कमांड देऊ शकता. गुगल तुमची रिक्वेस्ट पूर्ण करेल.

असं करा इनेबल

जर पावर बटननं असिस्टंट अ‍ॅक्टिव्हेट झाला नाही तर फोनमध्ये गुगल अ‍ॅप ओपन करा, उजवीकडे तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करा. त्यानंतर सेटिंग ओपन करा. इथे गुगल असिस्टंटच्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर Hey Google आणि Voice Match वर क्लिक करा. त्यानंतर व्हॉइस सिलेक्ट करा आणि इनेबल करा.

आयफोन युजर्ससाठी

आयफोन युजर्स आयफोनमध्ये सीरी फीचर इनबेल करू शकतात आणि आयफोनला स्पर्श न करताच व्हॉइसना कंट्रोल करू शकतात. विशेष म्हणजे ऑथेंटिक अ‍ॅप्स व्यतिरिक्त इटकर कोणतेही अ‍ॅप वापरणे टाळावे आणि वापरावे लागलेच तर एकदा गुगलवर त्या अ‍ॅप्सचे रिव्यू आणि रेटिंग चेक करावे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.