Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
समुद्रसपाटीपासून १,००० मीटर उंचीवर राहणाऱ्या बालकांच्या तुलनेत समुद्रसपाटीपासून २,००० मीटर उंचीवर राहणाऱ्या बालकांमध्ये वाढ खुंटण्याचे प्रमाण ४० टक्के अधिक
असा केला अभ्यास
– पाच वर्षांखालील वयोगटातील १.६५ लाख बालकांच्या माहितीचे विश्लेषण
– राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण २०१५-१६च्या डेटाचा आधार
– जागतिक आरोग्य संघटनेचे निकषांनुसार वाढ खुंटण्याची व्याख्या निश्चित
– मणिपाल अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनमधील तज्ज्ञांचा संशोधकांच्या पथकात सहभाग
संशोधनातील निष्कर्ष
– पालकांचे तिसरे किंवा त्यापुढील अपत्य असलेल्या मुलांमध्ये वाढ खुंटण्याचा धोका अधिक, म्हणजेच ४४ टक्के.
– पहिले अपत्य असलेल्यांमध्ये हे प्रमाण ३० टक्के
– जन्मावेळी लहान आकाराच्या बालकांमध्ये वाढ खुंटण्याचे प्रमाण ४५ टक्के
प्रमुख निरीक्षणे
– सातत्याने अधिक उंचीच्या प्रदेशात राहिल्यामुळे भूक मंदावते, ऑक्सिजन कमी मिळतो, पोषक घटक शोषून घेण्यावर मर्यादा येतात.
– अर्थात ही निरीक्षणे असून त्यांचा थेट संबंध सिद्ध करता आलेला नाही.
प्रमुख आव्हाने
– कमी शेतीउत्पादन, प्रतिकूल हवामान यांमुळे डोंगराळ भागात अन्न असुरक्षेचा धोका मोठा.
– या भागात आरोग्य सेवा पुरवणे, पोषण आहार कार्यक्रम राबवणे ही आव्हाने.
वाढ खुंटण्याचे प्रमाण
एकूण-३६ टक्के
१.५ ते ५ वर्षे-४१ टक्के
१.५ वर्षांखालील- २७ टक्के
मातेचे शिक्षण हा कळीचा मुद्दा
– मातेचे शिक्षण अधिक तेवढे बालकांची वाढ खुंटण्याचे प्रमाण कमी असल्याचे निरीक्षण
– प्रसूतीपश्चात काळजी, क्लिनिक भेटी, लसीकरण, पूरक घटक, आरोग्य सुविधांच्या जवळ वास्तव्य हे घटक महत्त्वाचे ठरतात
अभ्यासकांच्या शिफारशी
– पुनरुत्पादन आरोग्यासाठी उपक्रम, महिलांसाठी पोषण आहार कार्यक्रम, अर्भके आणि लहान बाळांच्या आहाराकडे लक्ष, अन्नसुरक्षा उपाययोजना
– सातत्यपूर्ण संशोधन, देखरेख, मूल्यमापन याद्वारे योग्य धोरणे आणि कृती