Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

करांचा अमेरिकेला झटका? भरमसाट करबोजामुळे देशात तज्ज्ञांकडून मंदीची भीती व्यक्त

9

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : अमेरिकेतील भांडवली गुंतवणूकदारांवर भांडवली लाभ (कॅपिटल गेन) कराचा वाढीव बोजा टाकायचे बायडेन प्रशासनाने ठरवले आहे. हा प्रस्ताव अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी २०२५साठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मांडला आहे. ११ मार्च रोजी जाहीर झालेला हा अर्थसंकल्प १ जानेवारीपासून लागू होणार आहे. बायडेन यांनी पुन्हा निवडणूक जिंकल्यास प्रत्यक्षात येणाऱ्या या प्रस्तावामुळे अमेरिकेत मंदीची चाहूल लागत असल्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

बायडेन यांनी ४४.६ टक्के भांडवली लाभ कराचा प्रस्ताव दिला आहे. याची तुलना भारतातील भांडवली लाभ कराशी केल्यास भारतात दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी १० टक्के तर अल्पकालीन गुंतवणुकीसाठी ३२ टक्के भांडवली लाभ कर आकारला जात आहे. हा प्रस्तावित भांडवली लाभ कर केवळ श्रीमंतांवरच आकारण्यात येणार असल्याचा दावा बायडेन समर्थकांनी केला आहे. यामुळे पुढील दशकभरात अमेरिकी अर्थव्यवस्थेत सुमारे पाच लाख कोटी डॉलरची भर पडेल, असेही या समर्थकांचे म्हणणे आहे.

नेमका प्रस्ताव काय?

वार्षिक करपात्र १० लाख डॉलर उत्पन्न असलेल्या आणि चार लाख डॉलर उत्पन्न गुंतवणुकीतून मिळवणाऱ्या नागरिकांना बायडेन यांनी ४४.६ टक्के भांडवली लाभ कर लावण्याचे ठरवले आहे. अमेरिकेच्या इतिहासातील हा आजवरचा सर्वाधिक भांडवली लाभ कर असणार आहे. यापूर्वी १९७०मध्ये तत्कालीन अध्यक्ष जिमी कार्टर यांनी ४० टक्के भांडवली लाभ कर आकारला होता.

राज्यांमध्ये अधिक कर

अमेरिकेच्या सरकारने ४४.६ टक्के भांडवली लाभ कर आकारला जाणार आहे. मात्र अमेरिकेतील काही राज्यांमध्ये यापेक्षा कितीतरी अधिक कर लावला जाईल. कॅलिफोर्निया राज्यात ५९ टक्के आणि न्यू जर्सी राज्यात हा कर ५५ टक्के असेल. ओरिगॉन, मिनेसोटा आणि न्यू यॉर्क या राज्यांत देखील ५० टक्क्यांपेक्षा अधिक कराचा बोजा पडणार आहे.
युक्रेन, इस्रायलला अमेरिकेकडून ९५.३ अब्ज डॉलरचे अर्थसाह्य, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर निर्बंध
तज्ज्ञांचे मत

प्रस्तावित करवाढीमुळे अमेरिकेच्या जीडीपीमध्ये आगामी काळात २.२ टक्क्यांची घट होईल, अशी भीती अमेरिकेतील आर्थिक वैचारिक गट असलेल्या टॅक्स फाऊंडेशनने वर्तवली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना मिळणाऱ्या वेतनामध्ये १.६० टक्क्यांची घट होईल आणि तब्बल ७,८८,००० नोकऱ्यांवर गदा येईल, अशीही भीती या फाऊंडेशनने व्यक्त केली आहे. अमेरिकेची कररचना अधिक गुंतागुंतीची करणारी ही करवाढ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

भीतीदायक करवाढीचे प्रस्ताव

– कॉर्पोरेट कर २१ टक्क्यांवरून २८ टक्के प्रस्तावित.
– वार्षिक १० लाख डॉलर वेतन मिळवणाऱ्यांना मिळणाऱ्या करवजावटी रद्द.
– १० कोटी डॉलरपेक्षा अधिक मत्ता असणाऱ्या व्यक्तींवर किमान २५ टक्के कर.
– भेटींवरील करवजावट रद्द
– इस्टेट करावरील सवलत रद्द
– एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या मालमत्तेवरील कर ६० टक्क्यांवरून ८० टक्क्यांवर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.