Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

स्निकोमीटर ऐवजी आयपीएलमध्ये अल्ट्रा एज का वापरतात? जाणून घ्या टेक्नॉलॉजी

11

आयपीएल २०२४ चे सामने रोज होत आहेत. या लढतीत तुमच्या आवडीच्या संघाच्या विजयाच्या मागे सर्वात मोठा हात टेक्नॉलॉजीचा देखील आहे. आयपीएलमध्ये अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. यातील टेक्नॉलॉजी म्हणजे Ultra-Edge आहे, जे Snickometer चं अ‍ॅडव्हान्स व्हर्जन आहे. या टेक्नॉलॉजीच्या मदतीनं पंच अनेक निर्णय घेतात, चला जाणून घेऊया याची माहिती.

क्रिकेट प्रेमींचा क्रिकेटवर इतकं लक्ष असतं की टेक्नॉलॉजीचा विचार केला जात नाही. परंतु टेक्नॉलॉजी मुळेच थर्ड अंपायरला निर्णय देण्यास मदत होते. अशीच एक टेक्नॉलॉजी Ulrta-Edge आहे. थर्ड अंपायरला तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरताना अनेकदा पाहिलं असेल. यात एक ग्राफ दाखवला जातो, ज्यात बॉल बॅटला टच होताच रीडिंग दिसते. त्यामुळे अंपायरला निर्णय घेण्यास मदत होते. चला जाणून घेऊया Ultra-Edge टेक्नॉलॉजी म्हणजे काय आणि क्रिकेट मध्ये हिचा वापर कसा केला जातो.

Ultra-Edge टेक्नॉलॉजी म्हणजे काय?

क्रिकेट मध्ये टेक्नॉलॉजीचा वापर नवीन नाही. यातील Ultra Tech टेक्नॉलॉजीची ही स्निकोमीटरचं अ‍ॅडव्हान्स व्हर्जन आहे, जी एज डिटेक्शनसाठी वापरली जाते. Snickometer टेक्नॉलॉजी ब्रिटिश कम्प्युटर सायंटिस्ट Allan Plaskett यांनी बनवली होती. ही टेक्नॉलॉजी १९९९ मध्ये युनायटेड किंगडमच्या चॅनेल ४ नं पहिल्यांदा वापरली होती. अल्ट्रा एज टेक्नॉलॉजीच्या टेस्ट आणि सर्टिफिकेशन नंतर ICC नं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ही टेक्नॉलॉजी वापरण्यास सुरुवात केली.

ही टेक्नॉलॉजी Massachusetts Institute of Technology (MIT) च्या इंजीनियर्सनी टेस्ट केली. या टेक्नॉलॉजीमध्ये स्टंपच्या मध्यभागी माइक ठेवला जातो. तसेच पिचच्या आजूबाजूला अनेक कॅमेरे असतात. जेव्हा बॉल बॅटला स्पर्श करतो तेव्हा एक वेगळा आवाज येतो. हा आवाज स्टंपमधील माइक पकडतो आणि ट्रॅकिंग स्क्रीनवर डिटेक्ट करतो. स्टंप मधील माइक बॅट आणि पॅडच्या आवाजातील फरक ओळखू शकतो. त्यामुळे बॉल बॅटला लागलाय की पॅडला हे समजते. तसेच पिचवरील अनेक कॅमेरा अँगलमधून बॉलवर नजर ठेवली जाते.

अल्ट्रा एज मधील त्रुटी

डिस्प्लेवर काही व्हेव्ज दिसतात ज्या बॅटला बॉल टच झाल्यामुळे येतात. यांचा वापर बॅट्समॅन आउट आहे की नॉट-आउट हे ठरवण्यासाठी केला जातो. परंतु या टेक्नॉलॉजीकडून देखील चुका होऊ शकतात. कधीकधी माइकमध्ये एक्सटर्नल साउंड येतो. तर कधी बॅट पिचला टच होते तेव्हाच बॉल देखील बॅटला टच होतो. त्यामुळे स्पष्ट निर्णय देता येत नाही. तसेच जेव्हा बॉल प्लेयरच्या शरीर आणि बॅटला एकाच वेळी टच करतो तेव्हा देखील अल्ट्रा एजवर विश्वास ठेवता येत नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.