Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
याबाबत BOOM ने व्हायरल स्क्रिनशॉटचा तपास केला. त्यांच्या तपासात असं आढळून आलं, की व्हायरल स्क्रिनशॉट हा एडिट केलेला आहे. इंडिया टुडेच्या मूळ ग्राफिक्समध्ये UP मध्ये सपाला लोकसभेच्या ७ जागा जिंकण्याची शक्यता दर्शवण्यात आली. इंडिया टुडेच्या ग्राफिक्सचा स्क्रिनशॉट शेअर करताना, एका एक्स युजरने लिहिलंय, की ‘इंडिया टुडेने उत्तर प्रदेशच्या सर्वेक्षणात सपाला १७ जागा दिल्या आहेत, तर काँग्रेसला ५ जागा दिल्या आहेत, फक्त पाहत राहा, ही फक्त सुरुवात आहे, सपा एकट्याने ३० हून अधिक जास्त जागा जिंकेल’.
(आर्काइव लिंक)
फेसबुकवरही या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(आर्काइव लिंक)
फॅक्ट चेक
बूमने व्हायरल स्क्रिनशॉटची तपासणी करण्यासाठी इंडिया टुडेचं यूट्यूब चॅनेल तपासलं. २० मार्च २०२४ रोजी चॅनलवर अपलोड केलेला मूळ व्हिडिओ आढळला. व्हिडिओमध्ये १:३५:५२ मिनिटांवर सर्वेक्षणानुसार पक्षांना किती जागा मिळण्याची शक्यता आहे हे दाखवलं आहे. सर्वेक्षणात उत्तर प्रदेशात भाजपला ७० जागा, अपना दल २ जागा, काँग्रेस १ जागा, सपा ७, बसपा ० आणि इतरांना ० जागा देण्यात आल्या आहेत. (व्हिडिओ इथे पाहा)
निष्कर्ष
खाली दिलेल्या फोटोमध्ये व्हायरल झालेला स्क्रिनशॉट आणि मूळ ग्राफिक्समधील फरक पाहता येऊ शकतो. व्हायरल स्क्रिनशॉटमधील दावा खोटा असल्याचं यातून सिद्ध होत आहे.
(This story was originally published by Boom Fact Check, and republished by MT as part of the Shakti Collective.)