Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई उत्तर पूर्व-२८ लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवारी अर्ज दाखल – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर
मुंबई, दि. 29 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २८ – मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात 26 एप्रिल रोजी अर्ज स्वीकृती प्रक्रियेस सुरवात झाली. आज दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला असल्याची माहिती मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.
आज दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी 1 ) भवानी हिरालाल चौधरी (सरदार वल्लभ भाई पटेल पार्टी) (2) बबन सोपान ठोके (अपक्ष) या उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. मुंबई उत्तर पूर्व या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत 155 – मुलुंड, 156 – विक्रोळी, 157 – भांडुप पश्चिम, 169 – घाटकोपर पश्चिम, 170 – घाटकोपर पूर्व, 171 – मानखुर्द शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ येतात. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 मे 2024 रोजी दुपारी 3.00 पर्यंत आहे. 4 मे रोजी दाखल अर्जाची छाननी करण्यात येईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ६ मे २०२४ आहे. दिनांक २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे आणि 4 जून रोजी मतमोजणीची प्रक्रिया उदयांचल शाळा, गोदरेज संकुल, विक्रोळी येथे करण्यात येणार आहे.
000