Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तुम्हाला तुमच्याच घरात केले जाईल कैद आणि साफ होईल तुमचे बँक अकाउंट; जाणून घ्या काय आहे ‘डिजिटल हाऊस अरेस्ट’

12

जग डिजिटल होत असताना ऑनलाइन फसवणुकीच्या पद्धतीही झपाट्याने बदलल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, 2023 या आर्थिक वर्षात सुमारे 30,000 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीची नोंद झाली आहे. नुकतेच प्रयागराजमध्ये असेच एक प्रकरण समोर आले होते, ज्यात घोटाळेबाजांनी एका महिलेला तिच्या घरीच बंधक बनवून 1 कोटी 48 लाख रुपयांची फसवणूक केली होती.

सायबर गुन्ह्याची पूर्णपणे नवीन पद्धत

सायबर गुन्ह्याची ही एक पूर्णपणे नवीन पद्धत आहे, ज्यामध्ये घोटाळेबाज तुम्हाला पोलिस, सीबीआय किंवा कस्टम अधिकाऱ्यांची तोतयागिरी करत कॉल करतात, तुम्हाला घाबरवतात आणि तुम्हाला घरात ओलीस ठेवतात. घोटाळ्याचा हा खेळ इथून सुरू होतो. या प्रकारच्या घोटाळ्याला ‘डिजिटल हाऊस अरेस्ट’ म्हणतात. येथे या घोटाळ्याची सविस्तर माहिती देत आहोत आणि ते टाळण्याचे मार्ग सांगत आहोत.

काय आहे डिजिटल हाऊस अरेस्टची पद्धत

नावाप्रमाणेच घोटाळेबाज पीडित व्यक्तीला कॉल करतात किंवा व्हिडिओ कॉल करतात आणि त्याला ओलीस ठेवतात. यात घोटाळेबाज एक सेटअप तयार करतात ज्यामुळे व्हिडीओ कॉलमध्ये असे दिसते की ते पोलिस स्टेशनशी बोलत आहेत.तोतया पोलीस पुढे सांगतात की, तुमचा फोन नंबर, आधार, बँक खात्यावर चुकीचे काम झाले आहे. अटकेचा धाक दाखवून ते पीडित व्यक्तीला घरात डांबून ठेवतात. त्यांना पैसे देण्यास भाग पाडतात.

प्रयागराजमध्ये असे झाले डिजिटल हाऊस अरेस्ट

प्रयागराजच्या ताज्या उदाहरणावरून या घोटाळ्याची पद्धत समजू शकते.
प्रयागराज येथील एका महिलेने सांगितले की, तिला फोन आला होता. इंटरनॅशनल कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याने हा कॉल केल्याचे भासविण्याचा आले होते. तिच्या नावाने ड्रग्ज, लॅपटॉप आणि क्रेडिट कार्ड असलेले पार्सल तैवानला पाठवले जात असल्याचे त्याने महिलेला सांगितले.अशा कोणत्याही पार्सलबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे महिलेने सांगितल्यावर त्यांनी याबाबत तक्रार नोंदवत असल्याचे सांगितले. यानंतर महिलेला एक व्हिडिओ कॉल येतो, ज्याची पार्श्वभूमी पोलीस स्टेशनची होती.पोलीस अधिकाऱ्याची तोतयागिरी करणाऱ्या व्यक्तीने महिलेला व्हिडिओ कॉलवर सुमारे तीन दिवस ओलीस ठेवले आणि तिला धमकावून वेगवेगळ्या खात्यांमध्ये 1 कोटी 48 लाख रुपये जमा करण्यास सांगितले.

कसे टाळाल सायबर संकट

कोणत्याही प्रकारची सायबर फसवणूक टाळण्यासाठी, आपण नेहमी सावध आणि सतर्क असले पाहिजे. येथे तुम्हाला अशा काही उपायांची माहिती देत आहोत ज्याद्वारे तुम्ही अशा घोटाळ्यांपासून दूर राहू शकता.

जागरुक आणि सावध राहा

जर तुम्हाला असे कॉल आले तर सर्वप्रथम तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. यासोबतच ऑनलाइन घोटाळे आणि फसवणुकीच्या पद्धतींबाबतही जागरूक राहा. तुम्ही हेही लक्षात ठेवावे की सरकार, बँक किंवा कोणतीही तपास यंत्रणा तुम्हाला कॉलवर घाबरवू किंवा धमकावू शकत नाही. तुम्ही कॉल डिस्कनेक्ट करा आणि त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करा.

ओळख पडताळणी करा

कॉलवर कोणाशीही वैयक्तिक किंवा आर्थिक तपशील यासारखी माहिती शेअर करू नका. जरी तुम्हाला अशी माहिती पाठवायची असली तरी प्रथम कॉलरची ओळख पडताळून पहा. जसे की तुम्हाला आधीच सांगितले आहे की, बँक किंवा कोणतीही अधिकृत संस्था तुम्हाला फोनवर पिन किंवा तुमच्याशी संबंधित वैयक्तिक माहिती विचारत नाही.

संशयास्पद ॲक्टिव्हिटीजची तक्रार करा

तुम्हाला स्कॅमरकडून कोणत्याही प्रकारे कॉल किंवा मेसेज मिळाल्यासत्यांची तक्रार करा. यासोबतच तुमच्या बँक खात्यात काही संशयास्पद वाटल्यास त्याचीही तक्रार करा. स्कॅम कॉल्स किंवा मेसेजची तक्रार करण्यासाठी तुम्ही सरकारी पोर्टल Chakshu वापरू शकता.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.