Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पाच दिवसांत ‘जुनं फर्निचर’ची कोट्यवधींची कमाई, पण दोन सिनेमांच्या टक्करनं गणित बदलणार?

9

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बॉक्स ऑफिसवर हिंदी सिनेमांची चलती असायची. बॉलिवूडच्या बड्या स्टार मंडळींचे सिनेमे धुमशान घालायचे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल व्हायची; पण गेल्या काही वर्षांमध्ये हे चित्र बदललं आहे. मराठी सिनेमे बॉलिवूडपेक्षा वरचढ ठरले आहेत. मराठी सिनेमांचं नाणं एकदम खणखणीत वाजतंय. गेल्या वर्षी मराठी सिनेमांनी कोट्यवधींची कमाई करत बॉक्स ऑफिस गाजवलं. आता नवीन वर्षातही मराठी सिनेमांना प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. पण आता मराठी सिनेमांची बॉक्स ऑफिसवरची टक्कर पाहाता सिनेमांच्या कमाईवर परिणाम होताना दिसणार आहे.

गेल्या आठवड्यात महेश मांजरेकर यांचा ‘जुनं फर्निचर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. वृद्धांच्या अस्तित्वावर भाष्य करणाऱ्या या सिनेमानं पाच दिवसांत चांगली कमाई केली आहे. या चित्रपटानं आतापर्यंत ३.६ कोटींची कमाई केली आहे. या पहिल्या दोन दिवसांपेक्षा तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत वाढ झाल्याचं दिसून आलं होतं. मात्र आता सिनेमाची कमाई घटण्याची शक्यता आहे. या सिनेमाला टक्कर देण्यासाठी आणखी दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर धडकले आहेत.

बॉक्स ऑफिसवर टक्कर
आज १ मे, महाराष्ट्र दिन असल्यानं दोन बिग बजेट मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल झाले आहेत. एक आहे ‘नाच गं घुमा’ हा सिनेमा आणि दुसरा आहे, .’स्वरगंधर्व सुधीर फडके’हा चित्रपट. हे दोन सिनेमे आज प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळं बॉक्स ऑफिसवर तगडी स्पर्धा पाहायला मिळत आहे.

‘नाच गं घुमा’ सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा स्त्रियांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर आणि गमतीजमतींवर आधारित आहे. ‘नाच गं घुमा’ सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाची टीम जोरदार प्रमोशन करताना दिसतेय. नोकरी करणाऱ्या महिलांच्या आयुष्यात कुटुंबासोबतच मदतनीस म्हणजेच कामवाली बाई देखील किती महत्त्वाची असते… तिचं घरात असणं, नसणं…याभोवती सिनेमाचं कथानक फिरतं.

नटाला थोडसं आगाऊ असावं लागतं असं मुक्ता बर्वे का म्हणाली?

तर दुसरा सिनेमा सुधीर फडके यांच्या आयुष्यावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा आहे. हा सिनेमा म्हणजे आजवरचा सर्वात भव्य स्वरमयी बायोपिक ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमाच्या निमित्तानं बाबुजी आणि त्यांच्यासोबत गायलेल्या अनेक नामवंताच्या असंख्य गाजलेल्या गाण्यांना चित्रपटगृहात नव्यानं अनुभवण्याची पर्वणी या कलाकृतीच्या माध्यमातून मिळणार आहे. या चित्रपटात एकूण २७ गाणी असून या चित्रपटाच्या माध्य्मातून प्रेक्षकांना संगीत नजराणा मिळणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.