Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जळगावात महिलेसह मुलाचा अपघाती मृत्यू तर बहिण गंभीर जखमी..

16

जळगाव : एरंडोलहून दुचाकीने जळगावकडे निघालेल्या महिलेच्या दुचाकीला गॅस टँकरची धडक बसल्याने झालेल्या अपघातात महिलेसह मुलाचा मृत्यू झाला तर मयत महिलेची बहिण गंभीर जखमी झाली. हा अपघात सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळ घडला. अपघातग्रस्त गॅस टँकर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अपघाताने एरंडोलसह जळगावात हळहळ
शिक्षिका रुपाली पाटील या जळगावातील मुक्ताईनगर भागात आई- वडिलांकडे वास्तव्यास असून त्या एरंडोल येथे बेलवेदर इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षिका आहेत. एरंडोल येथेच त्यांची बहिण चारुशीला राहुल पाटील (40) व त्यांचा मुलगा निशांत राहुल पाटील (12) वास्तव्यास आहेत. सोमवारी चारुशीला या जळगाव येथे माहेरी येणार असल्याने त्यांनी बहिणीसोबतच मुलाला घेवून एरंडोलहून अ‍ॅक्टीव्हा (एम.एच.१९ डी.क्यू.३८९६) ने प्रवास सुरू केला मात्र बांभोरी पुलाजवळ गॅस टँकरचा फटका बसल्याने अपघात होवून चारुशीला पाटील व त्यांचा मुलगा निशांत पाटील यांचा टँकरच्या मागील चाकात आल्याने मृत्यू ओढवला तर शिक्षिका रुपाली पाटील या अपघातात गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेला गॅस टँकर जळगाव तालुका पोलीस स्थानकात जमा करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.