Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गोदावरी नदीनं धारण केलं रौद्ररूप, मंदिरं पाण्याखाली; पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

13

हायलाइट्स:

  • गोदावरी नदीनं धारण केलं रौद्ररूप
  • मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर
  • गोदाकाठावरील मंदिरे पाण्याखाली.

गडचिरोली : मुसळधार पावसामुळे गडचिरोलीत हाहाकार माजला आहे. गोदावरी नदीने रौद्ररूप घेतल्यामुळे तेलंगाणा आणि गडचिरोली प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुलाब चक्रीवादळामुळे तेलंगाणा राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील कालेश्वरम येथे गोदावरी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. (gadchiroli weather news Godavari river thunderstorm a warning to the riverside villages due to floods)

गोदावरी आणि प्राणहिता नद्या मुसळधार पावसाने ओसंडून वाहत आहेत. गोदावरीच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढत असल्याने तेलंगाणा प्रशासनातर्फे आधीच सतर्कतेचा इशारा दिला असून नदी काठावर वसलेल्या लोकांना सुरक्षित भागात जाण्याचे आवाहन करत आहेत.

पूर नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार गोदावरी नदीवर बांधलेल्या लक्ष्मी बॅरेज (मेडिगड्डा) चे ८५ पैकी ७९ गेट उघडले असून २८५७८ क्युसेक (१०,०९,२५० क्यूसेक) आहे. कालेश्वरम सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या ०.४५ मीटरने वर आहे. त्यामुळे गडचिरोली प्रशासनाने सुद्धा गोदावरी नदी काठावरील गावांतील नागरिकांना उचित सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला आहे.

गडचिरोली जिल्हयातील पूर‍ स्थितीबाबत संक्षिप्त अहवाल

वैनगंगा नदी :

– गोसीखुर्द धरणाचे ३३ पैकी ५ गेट ०.५०मी. ने उघडलेले असून ७६३ क्युसेक विसर्ग सुरु आहे. विसर्ग सामान्य असल्याची माहिती

– चिचडोह बॅरेजचे ३८ पैकी ३८ गेट उघडलेले असून विसर्ग १९६६ क्युसेक आहे.

– इटियाडोह प्रकल्प – ७१.८२ क्युसेक / कालवा- २२.६५ क्युसेक / वेस्ट वेअर ओवरफ्लो
नदीची पाणी पातळी – पवनी, वडसा, वाघोली व आष्टी सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे. (gadchiroli weather news Godavari river thunderstorm a warning to the riverside villages due to floods)

वर्धा नदी :

– निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ पैकी १३ गेट उघडलेले असून विसर्ग ३६८ क्युसेक आहे.

– बामणी (बल्हारशा) व सिरपूर/सकमूर सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.

प्राणहिता नदी :

– प्राणहिता नदीची पाणी पातळी महागांव व टेकरा सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे.

गोदावरी नदी :

– लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे ८५ पैकी ७९ गेट उघडलेले असून विसर्ग २८६७८ क्युसेक आहे.

– गोदावरी नदी काठावरील गावांतील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.

– गोदावरी नदीची पाणी पातळी कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या ०.४५ मीचरने वर आहे.
शिवसेनेला मोठा धक्का! महिला खासदाराला ईडीची नोटीस, चौकशीला हजर राहण्याचे आदेश
इंद्रावती नदी :

– इंद्रावती नदीची पाणी पातळी जगदलपूर, चिंदनार व पाथागुडम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे.

– पर्लकोटा नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरील सकाळी ८.३० वाजताच्या नोंदीनुसार पूलाच्या ४.४५मीटरने खाली आहे. (gadchiroli weather news Godavari river thunderstorm a warning to the riverside villages due to floods)
पुरात वाहून जाणाऱ्या व्यक्तिला बाईकसह बचावलं, पाहा काळजाचा ठोका चुकावणारा LIVE VIDEO

(gadchiroli weather news Godavari river thunderstorm a warning to the riverside villages due to floods)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.