Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Apple ने iPhone बनविणे स्टीव्ह जॉब्सना नव्हते पसंत; जाणून घ्या का होता त्यांना फोनचा तिरस्कार

12

Apple आज जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन उत्पादकांपैकी एक आहे, त्यांना दरवर्षी मिळणाऱ्या यशामुळे त्यांचे iPhones जगभरात सर्वाधिक पसंत केले जातात. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अशा प्रसिद्ध आयफोनच्या निर्मितीमागे अनेक कुशाग्र बुद्धिमत्तेच्या टीमसह हा मोबाईल बनविण्याबाबत सुरवातीपासूनच साशंक चालणारे एक सीईओ देखील होते. आयफोनची आज विक्रमी विक्री होत असली, तरी Apple सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स नेहमी या कल्पनेच्या बाजूने नव्हते. खरं तर, सुरुवातीला त्यांचा असा विश्वास होता की ॲपल ने स्वतःचे फोन बनविणे योग्य नाही.

ॲपल आयफोन बनवण्यामागे रंजक कथा

ॲपलने असा यशस्वी आयफोन बनवण्यामागे एक रंजक कथा आहे. ‘द वन डिव्हाईस: द सीक्रेट हिस्ट्री ऑफ द आयफोन’ या पुस्तकात लेखक ब्रायन मर्चंट स्पष्ट करतात की, ॲपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स सुरुवातीला स्मार्टफोन बनवण्याच्या विरोधात होते. 2005 मध्ये, स्टीव्ह जॉब्स म्हणाले, “फोन बनवताना समस्या अशी आहे की, आम्हाला फोन युजर्सपर्यंत पोचवण्यासाठी अनेक मोबाईल नेटवर्क कंपन्यांशी (एअरटेल, जिओ सारख्या) वाटाघाटी कराव्या लागतील आणि आम्ही या कामात फारसे काही चांगले नाही.’’ कोणता फोन आपल्या नेटवर्कवर चालवायला कोणती कंपनी परवानगी देईल याचीही त्यांना चिंता होतीच. तसेच,त्यांना असे वाटले की, कदाचित स्मार्टफोन फक्त ठराविक लोकांपुरतेच मर्यादित राहतील आणि प्रत्येकासाठी फायदेशीर नसतील.

इंजिनिअर्सनी गुप्तपणे केले तंत्रज्ञान तयार

ज्या वेळी स्टीव्ह जॉब्सला आयफोन बनवायला लावले जात होते, त्याच वेळी आयफोन बनवणाऱ्या टीमचे इंजिनीअर गुप्तपणे फोन ऑपरेट करण्यासाठी नवीन ‘मल्टी-टच टेक्नॉलॉजी’ तयार करत होते. हे तंत्रज्ञान इतके खास होते की ही खऱ्या अर्थाने एक कमाल असल्याची स्वतः ला खात्री होईपर्यंत त्यांनी ते जॉब्सना ते दाखवले नाही.

ॲपल निर्मितीसाठी स्टीव्हला पटवून दिले जात होते.

ब्रायन मर्चंटने त्याच्या पुस्तकात अँडी ग्रिग्नॉन या सीनिअर आयफोन इंजिनीअरचा उल्लेख केला आहे, जे म्हणतात की, “ॲपलसाठी फोन बनवणे ही एक चांगली कल्पना असल्याचे कार्यकारी संघाकडून स्टीव्हला पटवून दिले जात होते. त्यांना यशाचा कोणताही स्पष्ट मार्ग दिसत नव्हता”. नंतर, आयफोनच्या फायनल डेव्हलपमेंट नंतर आयफोन वापरून कॉल करणारा डी ग्रिग्नन हा पहिला व्यक्ती बनला.

आणि स्टीव्ह राजी झाले

दरम्यान, ॲपल कर्मचारी स्टीव्ह जॉब्स यांना राजी करत असतांनाच ॲपलचे उपाध्यक्ष मायकेल बेल यांनी 7 नोव्हेंबर 2004 रोजी रात्री उशिरा स्टीव्ह जॉब्स यांना एक ईमेल देखील लिहिला. या ईमेलमध्ये त्यांनी फोन बनवण्याचे फायदे सांगितले. या प्रदीर्घ ईमेलनंतर स्टीव्ह जॉब्स आणि मायकेल बेल यांनी तासनतास चर्चा केली आणि शेवटी जॉब्सने होकार दिला. संभाषणानंतर, जॉब्स म्हणाले, ‘ठीक आहे, मला वाटते की आपण हे केले पाहिजे.’

‘ही’ भीती होती

स्टीव्ह जॉब्सना सुरुवातीला आयफोन बनवण्यात रस नसल्याचे मुख्य कारण म्हणजे स्मार्टफोनमुळे त्यांच्या आयपॉडची विक्री कमी होऊ शकते याची त्यांना भीती होती. दरम्यान, ब्रायन मर्चंटने सीएनबीसीला एका मुलाखतीत सांगितले की, जॉब्स अशा फोनसाठी तयार आहेत जो वापरण्यास सोपा आणि मजेदार असेल. सोप्या शब्दात, जॉब्सला फोन तयार करण्यासाठी या दोन्हीही गोष्टीं हव्या होत्या एक म्हणजे, त्या फोनने iPod ची जागा घेऊ नये आणि दुसरे म्हणजे ते वापरण्यात सोपा आणि ग्राहकांना नवीन अनुभव देणारा असावा.

ॲपल ऑफिसमध्ये ठेवली गुप्तता

आता स्टीव्ह जॉब्सला फोन बनवण्याची खात्री होती, पण त्याने संपूर्ण ॲपल ऑफिस आणि कर्मचाऱ्यांमध्ये आयफोनबद्दल गुप्तता ठेवली. हा फोन बनवणाऱ्या स्पेशल टीमलाच याची माहिती होती. जॉब्सचा या टीमवर विश्वास होता. ब्रायन मर्चंट त्यांच्या मुलाखतीत म्हणतात की, ‘येथे प्रत्येक स्तरावर काम करणाऱ्या लोकांचे योगदान नसते तर आयफोन कधीच बनला नसता.’

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.