Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

new guidelines for navratri: राज्यात ‘असा’ साजरा होणार नवरात्रौत्सव; राज्य सरकारने केल्या नव्या गाइडलाइन जारी

16

हायलाइट्स:

  • राज्य शासनाच्या नवरात्रौत्सवासाठी नव्या गाइडलाईन्स जारी.
  • देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांसाठी ४ फुटांची, तर घरगुती मूर्तीची उंची २ फुटांचीच असावी.
  • गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत.

मुंबई: राज्यात ७ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव हा सण साजरा होत आहे. करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी देखील करोनाचा धोका अजूनही टळलेली नाही. हे लक्षात घेता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत गर्दी करून उत्सव साजरा करणे उचित होणार नसल्याचे सांगत राज्याच्या गृह विभागाने नवरात्रौत्सवासाठी नव्या मार्गदर्शक (New Guidelines) सूचना जारी केल्या आहेत. (the state government issued new guidelines for navratri see all at one click)

राज्य शासनाच्या या नव्या मार्गदर्शन सूचनांनुसार, देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांसाठी ४ फुटांची, तर घरगुती देवीच्या मूर्तीची उंची २ फुटांचीच असावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत असे स्पष्टपणे म्हटले आहेत. तर, देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, असाही नियम देण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद; केल्या महत्वाच्या सूचना

पाहा, संपूर्ण नियमावली

> सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी महापालिका तसेच स्थानिक प्रशासनाची त्यांच्या धोरणानुसार योग्य पद्धतीने पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

> कोविड-१९मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाच्या मंडपाबाबतच्या धोरणाशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारावेत.

> यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तींची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी.

> देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांसाठी ४ फुटांची, तर घरगुती देवीच्या मूर्तीची उंची २ फुटांचीच असावी.

> शक्यतो देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातूच्या किंवा संगमरवरच्या मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास अशा मूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्याघरीच करावे.

> देवीच्या मूर्तीचे विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

> नवरात्रौत्सवासाठी वर्गणी किंवा देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा.

> जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पाहावे.

> तसेच आरोग्य विषयक आणि सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.

> गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्यांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे. या द्वारे मलेरिया, डेंग्यू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय, तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.

> देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन
देण्याबाबत जास्तीतजास्त व्यवस्था करण्यात यावी.

> देवीच्या मंडपामध्ये प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

> आरती, भजन, किर्तन आणि इतर धार्मिक कार्यक्रम आयोजिक करताना गर्दी होणार नाही, तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे आणि तरतुदींचे पालन करण्यात यावे.

> मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असेल.

> देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

> विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे.

> लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील किंवा इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

> महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी . तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्रांची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीतजास्त प्रसिद्धी देण्यात यावी.

> विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात येत असेल, तर मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.

क्लिक करा आणि वाचा- मुंबईच्या समुद्रात क्रूझमधील ड्रग पार्टीवर एनसीबीचा छापा; मोठ्या अभिनेत्याच्या मुलासह १० जण ताब्यात
रावण दहनाबाबतही मार्गदर्श सूचना

> दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. रावण दहनासाठी आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. या कार्यक्रमाला प्रेक्षकांना बोलावू नये. त्यांना फेसबुकसारख्या समाजमाध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी.

क्लिक करा आणि वाचा- ‘सर्व आरोप खोटे’; कथित ऑडिओक्लिप प्रकरणी रामदास कदम कोर्टात जाणार

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.