Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- मुसळधार पावसाने कोल्हापूरला झोपडले.
- ऑक्टोबर हिटमध्ये पाऊस कोसळल्याने कोल्हापुरात गारवा.
- कोल्हापुरात सखल भागात साचले पाणी.
दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर सायंकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. जोरदार वारा, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटासह तासभर पावसाने हजेरी लावली आणि वातावरणात गारवा निर्माण झाला. (heavy rainfall with lighting in kolhapur rain water accumulated in low lying areas)
गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात अधून मधून पाऊस पडत आहे. दोन दिवस पावसाची सतत रिपरिप सुरू होती. रविवारी सायंकाळी पावसाने झोडपून काढले. सोमवारी दिवसभर कडक ऊन होते. ऑक्टोबर हिटचा चटका बसत होता. सायंकाळी पाच नंतर अचानक ढग दाटून आले. जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. तासभर पावसाने झोडपून काढले. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यासह पडलेल्या पावसाने सखल भागात पाणीच पाणी साचले. दिवसभरात उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळच्या पावसाने दिलासा दिला. पावसामुळे वातारवणात गारवा निर्माण झाला.
क्लिक करा आणि वाचा- ‘शिवसेना बॅक टू पव्हेलियन येऊ शकते’; रामदास आठवलेंच्या वक्तव्यामुळे चर्चा
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. धरण क्षेत्रात मोठा पाऊस पडत आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत अजूनही वाढ कायम आहे.
क्लिक करा आणि वाचा- मोठा दिलासा! राज्यात करोना संसर्गाचा आलेख येतोय खाली; मृत्यू घटले
क्लिक करा आणि वाचा- ‘…अन्यथा महाराष्ट्र बंद करू’; काँग्रेस नेते नाना पटोले यांचा भाजपला इशारा