Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
धोनी सोशल मीडियाबद्दल काय म्हणाला?
धोनी म्हणाला, ‘मला ट्विटरपेक्षा इन्स्टाग्राम जास्त आवडते. त्याचा विश्वास आहे की ट्विटरवर ऍक्टीव्ह असण्याचा काही विशेष उपयोग नाही. कारण या प्लेटफॉर्मवर नेहमीच काही ना काही कारणास्तव वाद सुरू असतात. कोणी काही लिहिते आणि मग तीच गोष्ट वादाचा विषय बनते. म्हणून तो असा विचार करतो, मला तिथे असण्याची गरज का आहे? कारण आधी Xवर केवळ 140 अक्षरं लिहिता येत होते, यामुळे फारसे काही स्पष्टपणे सांगता येत नव्हते. तेथे काही लिहिल्यास लोक आपल्या परीने अर्थ काढतात व वादाची ठिणगी पडते. म्हणून यापेक्षा मी प्रसिद्ध फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ऍक्टीव्ह राहणे पसंत करतो
म्हणून.. धोनीला आवडते इंस्टाग्राम
धोनीचा असा विश्वास आहे की माणसाला कमी विचलित करणाऱ्या गोष्टी नेहमी चांगल्या असतात. अनेकदा धोनीने सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याच्या चाहत्यांसह अपडेट्स शेअर केले आहेत.
पुढे तो म्हणाला, “मला अजूनही इन्स्टाग्राम आवडते कारण मी फक्त स्वतःचा फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करू शकतो. पण आता वेळेनुसार त्यातही बदल होत आहे. तरीही, मला इंस्टाग्राम आवडते, परंतु मी फार ऍक्टीव्ह नाही. पण कधी-कधी, मी चाहत्यांसाठी काहीतरी पोस्ट करतो, जेणेकरून त्यांना कळेल की मी आहे आणि सर्व काही योग्य चालले आहे. थोडक्यात मला आवडते तसे मी करत आहे.