Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजासह एकास घेतले ताब्यात…

9

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजासह एकास घेतले ताब्यात…


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

अवैधरित्या गांजा बाळगुन वाहतुक करणाऱ्या  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  ०३ किलो १८५ ग्राम गांजासह घेतले ताब्यात, एकुण १,०९,६२५/- रु मुद्देमाल केला जप्त….

हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक, जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील अवैद्य धद्दे व
शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा विक्री विरूध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्था. गु. शा. पोलिस निरीक्षक  विकास पाटील यांना दिले होते.
त्या अनुषंगाने दि.(२१) रोजी स्थागुशाचे सपोनि राजेश मलपिलु यांचे पथक पोस्टे बाळापुर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय माहिती मिळाली की, नांदेड ते बाळापुर रोडने एक इसम अंमली
पदार्थ गांजा घेवुन मोटारसायकलने डोंगरकडा कडे येत आहे अशी माहिती मिळाल्यावरून स्थागुशा च्या पथकाने दुपारी २.२० वा दरम्यान मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी डोंगरकडा परीसरात गोपनिय पद्दतीने व साध्या वेशात सापळा रचुन एक  इसम इद्रीस अब्बासखान पठाण रा. जवळा पांचाळ यास मोटार सायकलसह पकडुन त्याचे ताब्यातुन विक्री करीता बाळगुन आणलेला व शासनाने प्रतिबंधीत केलेला अंमली पदार्थ वाळलेला (गांजा) वनज ३.१८५ किलो ग्रॅ. किमती ७९,६२५ रु व मो. सायकल किं. ३०,००० रु असा एकुण १,०९,६२५ रुपयाचा मुददेमाल मिळुन आल्याने जप्त केला. त्यावरून पोस्टे बाळापुर येथे नमुद इसमाविरुध्द कलम २० (ब) एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे सपोनि राजेश मलपिलु यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक जी. श्रीधर अपर पोलिस अधीक्षक  अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि.  विकास पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.राजेश मलपिलु,
पोशि शेख बाबर, गजानन पोकळे, विठठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन यांनी केली

Leave A Reply

Your email address will not be published.