Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नागदुली येथील अल्पवयीन मुलीला खोटे आमीष दाखवुन पळवुन नेल्याप्रकरणी पोलिसात तक्रार..

13

(शैलेश चौधरी)

एरंडोल: तालुक्यातील नागदुली येथील एका ११वर्षीय अल्पवयीन मुलीला गुलाब लक्ष्मण गायकवाड याने आमीष दाखवुन पळवुन नेली असावी अश्या संशयाची तक्रार मुलीच्या पित्याने एरंडोल पोलिसात दिल्यावरून दि.४ऑक्टोंबर २०२१ रोजी सोमवारी राञी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत एरंडोल पोलीस सूञांकडून मिळालेल्या माहीतीनुसार नागदुली येथील मोलमजुरी करणारा पिता व आई हे म्हसावद येथून सायंकाळी ५ वाजता घरी परत आल्यावर त्यांची थोरली मुलगी ही घरी न दिसल्यामुळे त्यांनी लहान मुलगी अश्विनीस विचारले असता तीने सांगीतले की विखरण येथील चुलत बहीण पुनम हीचा नवरा गुलाब लक्ष्मण गायकवाड हा घरी आला असता आपली बहीण त्याचेसोबत निघुन गेली आहे.तीचा सर्वञ शोध घेतला असता ती मिळुन आली नाही. विखरण येथील गुलाब गायकवाड हा व्यक्ती दि.२३सप्टें.२०२१ पासुन कोणासही काही एक न सांगता निघुन गेला असुन पारोळा तालुक्यातील ढोली येथील त्याचे पाहुणे सोनू गणा ठाकरे(भिल्ल) याने त्यास याप्रकरणी मदत केली असावी असा संशय असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे,गुलाब गायकवाड हाच माझ्या मुलीला पळवून घेऊन गेला असावा असा संशय मुलीच्या पित्याने व्यक्त केला आहे. याबाबत एरंडोल पो. स्टे. ला गुन्हा रजी.नंबर /२१,भा.द.वी कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.