Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
DELHI FIRE : दिल्ली अग्निकांडामध्ये मृत पावलेल्या नवजात बालकांच्या कुटुंबीयांना पीएम मोदींकडून ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर
पीएमएनआरएफद्वारे कुटुंबीयांना २ लाखांची मदत जाहीर
पीएम मोदी यांनी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करत बालकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. याबाबतची अधिकृत पोस्ट पंतप्रधान कार्यालयाने सोशल मिडियावर शेअर केली आहे. दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रत्येक नवजात बालकाच्या कुटुंबाला पीएमएनआरएफ अंतर्गत २ लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
कुटुंबियांना न्याय मिळवून देणार
दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे ते म्हणाले की, ”घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी पीडितांच्या कुटुंबीयांना आश्वासन देतो की आम्ही दोषींवर कडक कारवाई करु व तुम्हाला न्याय मिळवून देऊ”
दरम्यान , पीएम मोदी यांच्या सह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त केला.
१२ नवजात बालकांना वाचवण्यात आले यश
दुर्घटनेतील एकूण १३ नवजात बालकांना वाचवण्यात आले आहे. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला असून एका जणाची प्रकृती गंभीर आहे, तर इतर पाच जणांवर उपचार सुरू आहेत.मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याबाबतची माहिती अद्यापही देण्यात आली नाही.