Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पृथ्वीच्या दिशेने येतोय धूमकेतू! दुर्बिणीशिवाय बघता येईल ही मोहक घटना, कधी दिसेल जाणून घ्या

8

2024 हे वर्ष खगोलीय घटनांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. 8 एप्रिल रोजी जगाने पहिले संपूर्ण सूर्यग्रहण पार पडले. यांनतर आलेले एक सौर वादळ (solar storms) चर्चेचा विषय ठरले. यामुळे युरोपातील अनेक देशांमध्ये ऑरोरा (Aurora) दिसले होते. आता एका धूमकेतूची पाळी आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, Tsuchinshan-ATLAS (C/2023 A3) नावाचा धूमकेतू ऑक्टोबरमध्ये पृथ्वीच्या दिशेने येत आहे, तो दुर्बिणीशिवाय म्हणजेच उघड्या डोळ्यांनी बघता येणार आहे.

दुर्बिणीशिवाय उघड्या डोळ्यांनी दिसेल

सध्या हा धूमकेतू मंगळ आणि गुरूच्या कक्षेत फिरत आहे. अशा प्रकारच्या खगोलीय घटना दुर्बिणीशिवाय दिसत नाही परंतु ऑक्टोबरमध्ये हा धूमकेतू दुर्बिणीशिवाय बघता येणार आहे. एक दुर्मिळ खगोलीय घटना घडेल. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की धूमकेतू ए3 रात्री शुक्रासारखा तेजस्वी दिसू शकतो.

रिपोर्टनुसार हा धूमकेतू A3 हा ऊर्ट क्लाउडमधून (Oort Cloud) आला आहे. आपल्या सौरमालेतील हे एक लाखो धूमकेतूंचे घर आहे. धूमकेतू A3 चा शोध गेल्या वर्षीच लागला होता.

ऑक्टोबर महिन्यात दिसेल हा धूमकेतू

फेब्रुवारी 2023 मध्ये, दक्षिण आफ्रिकेच्या ATLAS टेलिस्कोप आणि चीनच्या Tsuchinshan वेधशाळेच्या खगोलशास्त्रज्ञांनी एकत्रितपणे या धूमकेतूचा शोध लावला होता. अहवालानुसार ते ऑक्टोबरच्या मध्यात दिसणार आहे. सुप्रसिद्ध वेबसाइट व्हर्च्युअल टेलिस्कोप प्रोजेक्टने धूमकेतू A3चा फोटो शेअर केला आहे, जो 5 मे रोजी टिपण्यात आला होता.

वेबसाईटने धूमकेतूचे यूक्लियस दिसत असल्याचे लिहिले आहे. त्याच्या टेलमध्ये बदल होताना दिसत आहेत. नासाच्या मते, धूमकेतू हे एक प्रकारचे अवशेष आहेत जे सूर्यमालेच्या निर्मितीदरम्यान धूळ, खडक आणि बर्फापासून तयार झाले होते. धूमकेतूंची रुंदी काही किलोमीटर ते शेकडो किलोमीटरपर्यंत असते.

सूर्याभोवती फिरत असताना धूमकेतू गरम होतात आणि चमकू लागतात. या मटेरियलपासून धूमकेतूची टेल तयार होते, जी हजारो किमी लांबीची असू शकते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.