Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आधी कुटुंबातील ८ जणांची केली हत्या, मग गळफास घेऊन संपवले स्वत:चे जीवन

11

छिंदवाडा : मध्यप्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यात एका तरुणाने स्वत:च्या कुटुंबातील ८ जणांची कुऱ्हाडीने हत्या केल्याची घटना घडली आहे. तसेच हत्या केल्यानंतर सदर आरोपीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. तरुणाने कुटुंबियांची हत्या का केली? याबाबतची माहिती अद्यापही समोर आली नसून या घटनेमुळे आसपासच्या परिसरातील लोकांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी हा आदिवासी समाजातील होता. त्याचे नुकतेच (२१ मे) रोजी लग्न झाले होते. आरोपीने रात्री दोन तीन वाजेच्या सुमारास सर्वप्रथम पत्नीची हत्या केली, त्यानंतर त्याची ५५ वर्षीय आई, ३५ वर्षीय भाऊ, ३० वर्षीय वहिनी, १६ वर्षीय बहीण व ४ भाच्यांसह एकूण ८ जणांची कुऱ्हाडीने हत्या केली. त्यानंतर स्वत: आरोपीने गळफास घेऊन जीवन संपवले. दरम्यान, घटना घडल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सध्या संपूर्ण गावबंदी केली असून पुढील चौकशी सुरू आहे.
संतापजनक! घरी सोडण्याचं आमिष, ७८ वर्षीय वृद्धेवर नातवंडाच्या वयातील तिघांकडून अत्याचार

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी घडलेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, ” घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या दु:खाच्या प्रसंगी मी पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहे. सरकार त्यांना योग्य ती मदत करेल. तसेच पोलिसांना या घटनेबाबतची कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.