Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Karnataka Exit Poll: कर्नाटकात काँग्रेसला मोठा धक्का, भाजपला २० ते २२ जागा, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
मतदानाच्या टक्केवारीत एनडीएला ५५ टक्के तर इंडिया आघाडीला ४१ टक्के मत आणि इतर ला ४ टक्के मत मिळताना दिसत आहे.
२८ लोकसभा जागांचं गणित काय?
कर्नाटकच्या २८ जागांवर २६ एप्रिल आणि ७ मे ला दोन भागात मतदान पार पडलं. २६ एप्रिलला कर्नाटकच्या १४ जागा ज्यामध्ये उडुपी-चिकमंगलूर, हासन, दक्षिण कन्नड, चित्रदुर्ग, तुमकुर, मांड्या, मैसूर, चामराजनगर, बंगळुरु ग्रामीण, बंगळुरु उत्तर, बंगळुरु सेंट्रल, बंगळुरु दक्षिण, चिकबलपूर आणि कोलार यांचा समावेश आहे. ७ मेला उर्वरित १४ जागा चिकोडी, बेलगाम, बागलकोट, बीजापूर, गुलबर्गा, रायचूर, बीदर, कोप्पल, बेल्लारी, हावेरी, धारवाड, उत्तर कन्नड, दावणगेरे आणि शिमोगा येथे मतदान झालं.
कर्नाटकात पहिल्या फेजमध्ये १४ जागांवर ६९.९६ टक्के मतदान झालं. तर दुसऱ्या फेजमध्ये १४ जागांवर ६९.५६ टक्के मतदान झालं.
२०१९ मध्ये कुठल्या पक्षाला किती जागा?
गेल्या निवडणुकीत कर्नाटकात २०१९ मध्ये भाजपला २५ जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसने १ आणि जेडीएसने १ जागेवर विजय मिळवला होता. तर अपक्षने १ जागा जिंकली होती.
कर्नाटकच्या हॉट सीट
प्रज्वल रेवन्ना – हासन लोकसभा सीट – एनडीए
एम. श्रेयस पटेल – हासन लोकसभा सीट – काँग्रेस
तेजस्वी सूर्या – बंगळुरु दक्षिण – भाजप
सौम्या रेड्डी – बंगळुरु दक्षिण – इंडिया आघाडी
शोभा करंदलाजे – बंगळुरू उत्तर – इंडिया आघाडी
एमवी राजीव गौडा – बंगळुरु उत्तर – इंडिया आघाडी
मंसूर अली खान – बंगळुरु सेंट्रल – इंडिया आघाडी
पीसी मोहन – बंगळुरु सेंट्रल – भाजपा
एचडी कुमारस्वामी – मांड्या – एनडीए
एचडी कुमारस्वामी वेंकटरमने गौडा – काँग्रेस
यदुवीर वाडियार – मैसूर- भाजप
एम. लक्ष्मण – मैसूर-कोडागू – काँग्रेस
श्रीनिवास पुजारी – उडुपी-चिकमंगलूरु – भाजपा
जयप्रकाश हेगडे- उडुपी -चिकमंगलुरु