Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मतमोजनीच्या पुर्वी अवैध दारु बाळगणारे,वाहतुक करणार्यावर सावनेर पोलिसांची धडक कार्यवाही….

14


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

लोकसभा निवडनुक मतमोजनीच्या अनुषंगाने सावनेर पोलिसांनी अवैध दारू बाळगणारे आणि वाहतुक करणाऱ्या ०४ इसमावर कारवाई करून एकूण १५,५९,२६०/- रू. चा मुददेमाल केला जप्त…

सावनेर(नागपुर)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि.(०४)रोजी जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये लोकसभा निवडनुक मतमोजनीच्या अनुषंगाने दारू विक्री बंद असल्याने तसेच मतमोजणी असल्याने दि. ०३/०६/२०२४ रोजी रात्री ११.०० वा. ते दिनांक ०४/०६/२०२४ रोजी चे सकाळी ०५.०० वाजता कोंबीग ऑपरेशन दरम्यान रात्री ११.२५ वा. दरम्यान गांधी चौक येथे एम.एच ४० सि.एच ८७६५ क्रमांकाची लाल रंगाची किया गाडी संशईत रित्या मिळुन आल्याने पोलमस अधिकारी आणि अंमलदार यांनी गाडीची झडती घेतली असता किया गाडी क्रमांक एम एच ४० सि.
एच ८७६५ चे डिक्की मधून एकुण १२ बॉक्स विदेशी  दारु किंमती १,०१,५२० /- रू. चा माल मिळून आल्याने, किया गाडीचे चालक आकाश घनश्याम नारनवरे वय २४ वर्ष रा. रमाई नगर महादुला कोराडी यांचे वर नमुद गुन्हयात दारू आणि किया गाडी एकुण १५,०१५,२० /- रू चा माल अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आल्याने यातील आरोपी विरूध्द कलम ६५(अ), (ई), ८२ म.दा. का अन्वये कारवाई करून पो.स्टे सावनेर येथे अप क्र. ५४९ / २४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तसेच दिनांक ०३/०६/२०२४ रोजी  राम वासुदेव कोहाड वय ५२ वर्षे रा. धापेवाडा तह. सावनेर जि. नागपूर याचेवर अप. क्र ५४८ / २४ कलम ६५ ई म. दा. का प्रमाणे गुन्हा दाखल करून १५ लिटर कि १५०० रू. चा गावठी मोहाफुलाची दारू जप्त करण्यात आली, आरोपी रियाज इजाहर मंसूरी वय २८ वर्षे रा वार्ड नं १५ गजानन नगर सौंसर, तह सौंसर जि. पांढूर्णा, रोहीत सुरेश टेकाम वय २३ वर्षे रा. सिव्हील लाईन सौंसर तह. सौसर जि. पांढुर्णा यांचे विरूध्द अप कमांक ५४६ / २४ कलम ६५ ई म. दा का गुन्हा दाखल करून
५३,८००/- रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आला, अप कमांक ५४७ / २४ कलम ६५ ई म. दाका आरोपी शुभम विजय कछवा वय २३ वर्षे रा. किल्लापुरा सावनेर याचेकडून २४४० /- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक ०३/०६/२०२४ रोजी व दिनांक ०४/०६/ २०२४ रोजी एकूण ०४ गुन्हे दाखल करून एकूण १,०९,२६०/-रू. ची विदेशी दारू व गावठी दारूचा मुद्देमाल आणि किया गाडी कमांक एम एच ४० सि. एच ८७६५ व होंडा शाईन गाडी कमांक एम एच ४९ बि एस – २०३९ किंमती १४,५०,००० /- रू. असा एकूण १५,५९,२६०/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ, सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल मस्के,यांचे मार्गदर्शनाखाली
पोस्टे सावनेर येथील ठाणेदार पोलिस निरीक्षक रविन्द्र मानकर, सपोनि मंगला मोकाशे, सफौ सुभाष राठोड पोहवा अतुल खोडणकर, सुरेद्र वासनिक,संतोष बैरागी, पोशि अंकूश मुळे, अशोक निस्ताने,नितेश परखड, सचिन लोणारे यांनी केली असुन गुन्हयाचा तपास सपोनी सुरेन्द्र वासनिक हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.