Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चंद्राबाबूंचा नाय भरवसा, पाठिंबा देण्याच्या बाबतीत आहे रिकॉर्ड तसा ‘नकोसा’

9

मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. पक्षाच्या नेतृत्वाने यावेळी एनडीएसाठी ‘४०० पार’चा नारा दिला होता. पण निकाल स्पष्ट होताच भाजपला केवळ २४० जागा मिळाल्या, ५४३ जागांच्या तुलनेत बहुमताचा आकडा कमी झाला. तरीही, एनडीए आघाडीला बहुमत मिळवण्यात यश आले. पण आता टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू सत्तेस्थापनेतील प्रमुख खेळाडू आहेत. ‘किंगमेकर’ म्हणून उदयास आले, TDP म्हणजेच तेलगु देसम पक्ष सत्ताधारी NDA मधील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनलाय एकू १६ जागा जिंकल्या आहेत. तर JDU म्हणजेच जनता दल १२ जागांसह एनडीए मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. जागांची गणिते पाहता, एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला टीडीपी आणि जेडीयूवर अवलंबून राहावे लागणार आहे.

राजकीय परिस्थितीत चंद्राबाबू नायडूंवर विश्वास ठेवता येईल का? रंगली चर्चा

चंद्राबाबू नायडू यांच्याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. रिपोर्ट्सनुसार त्यांना इंडिया अलायन्सकडून ऑफर मिळाली आहे. असे असतानाही नायडू यांनी ‘आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि मी बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहे’, असे विधान केले आहे. या विधानामुळे भाजपला काहीसा दिलासा मिळाला असावा. तरीसुद्धा, आंध्र प्रदेशच्या विशेष राज्याच्या दर्जाशी संबंधित मुद्द्यांमुळे नायडू यांनी मार्च २०१८ मध्ये एनडीए सोबतचे संबंध तोडले हे लक्षात असणे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यांच्या निर्णयाचे परिणाम 2019 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दिसून आले जेथे त्यांना मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला, ज्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द प्रश्नचिन्हात अडकली होती.
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशमध्ये ‘एनडीए’चा डंका; YSR कॉंग्रेसचा मानहानिकारक पराभव, कोणाला किती जागा मिळाल्या?

नायडू सहा वर्षांनंतर, मार्च २०२४ मध्ये एनडीएत पुन्हा सामील झाले. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक भाजपा आणि जनसेना सोबत लढवली आणि आघाडीअंतर्गत टीडीपीने राज्यातील एकूण १७५ विधानसभेच्या जागांपैकी १४४ जागा लढवल्या, तर जनसेनेने २१, आणि भाजपने १० जागा लढवल्या. भाजपसोबत युती असूनही नायडू यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर नेहमी वेगळी असलेली भूमिका कायम ठेवली. “आम्ही सुरुवातीपासून मुस्लिमांच्या चार टक्के आरक्षणाला पाठिंबा देत आलो आहोत आणि यापुढेही देत राहणार” असे सांगून त्यांनी मुस्लिमांच्या चार टक्के आरक्षणाचे उघड समर्थन केले.
Lok sabha Election Result 2024 : भाजपला पहिल्यांदाच मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार, काय होणार परीणाम ?

एनडीएमध्ये पुन्हा सामील झाल्यानंतर नायडू यांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. मात्र मोदींशी त्यांचे संबंध नेहमीच चांगले राहिलेले नाहीत. 2002 मध्ये गुजरात दंगलीनंतर नायडू यांनी मोदींना विरोध केला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून अनेक विक्रमही त्यांच्या नावावर आहेत, सलग 13 वर्षे आणि 247 दिवसांचा प्रदीर्घ कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून नायडू यांनी भूषवले आहे. याशिवाय, अविभाजित आंध्रमधून तेलंगणा वेगळे झाल्यानंतर आंध्र प्रदेशावर राज्य करणारे ते एकमेव नेते आहेत.
Lok Sabha Election : नितीश कुमार बनले किंग मेकर! एनडीए की इंडिया आघाडी कोणाला देणार साथ?

चंद्राबाबू नायडू यांचा प्रभाव नेहमीच राज्याच्या राजकारणापलीकडे राष्ट्रीय राजकारणापर्यंत पसरलेला आहे. १९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी संयुक्त आघाडीचे नेतृत्व केले. १९९८ मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारला पाठिंबा देण्यापूर्वी त्यांनी आघाडीचे संयोजक म्हणून काम केले. जेव्हा ते एनडीएमध्ये सामील असल्याने त्यांनी संयोजकाची भूमिका देखील नीट पार पाडली.

नायडू यांची राजकीय कारकीर्द १९७० च्या दशकात सुरू झाली. आंध्र प्रदेशचा प्रादेशिक पक्ष, तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) मध्ये सामील होण्यापुर्वी ते सुरुवातीला युवक काँग्रेससोबत काम करत होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीत, केंद्रातील एनडीए सरकारमध्ये नायडू पुन्हा एकदा किंगमेकर म्हणून उदयास आले आहेत. त्याच्या पुढील वाटचालीकडे राजकीय वर्तुळातून बारीक लक्ष सध्या ठेवले जात आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.