Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Lok Sabha Result 2024 : मोदी-अमित शहा जोडीला पहिला झटका, अब की बार 400 पारचं घोडं कुठं अडलं ?

6

मुंबई : लोकसभा 2024 चा निकाल अंतिम टप्प्यात आला असून सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. आब की बार 400 पार नाऱ्याचं घोडं इंडिया आघाडीने अडवलं आहे. त्यामुळे राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असणाऱ्या अमित शहा,नरेंद्र मोदी या जोडीला सर्वात मोठा धक्का बसला आहे. गुजरातपासून मोदी- शहा या जोडीने संपूर्ण देशभरात आपला डंका वाजवला होता. 2014, व 2019 मध्ये देशात भाजपची सत्ता आली. काश्मीरमधील कलम 370 असो किंवा अयोध्येतील राम मंदिर असो हे दोन ऐतिहासिक निर्णय मोदी-शहा या जोडीने घेतले. तरी सुद्धा त्याचा जास्तीचा फायदा भाजपला होताना दिसला नाही.

उत्तर प्रदेशात काय झालं?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची फायरब्रँड नेते म्हणून देशभर प्रतिमा आहे. आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सूव्यवस्था सुधारण्याचं श्रेय देखील योगींना दिलं जातं. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वीच अयोध्येत श्रीराम मंदिरचं लोकार्पण झालं. त्यामुळे भाजपाची बाजू भक्कम मानली जात होती.

योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेवर राहुल गांधी आणि अखिलेश यादव हे भाजपवर भारी पडल्याचे दिसून आले आहे. तर मायावती यांचा बहुजन समाज पक्षाला या निवडणुकीत सपशेल अपयश आलंय. निवडणूक आयोगानं आत्तापर्यंत दिलेल्या माहितीनुसार एकाही मतदारसंघात मायावतींच्या बसपाचा उमेदवार आघाडीवर नाही. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीच्या मतांमध्ये फूट पडण्यात मायावतींना अपयश आलं. त्याचा थेट फटका भाजपाला बसला. त्याचबरोबर राज्यातील मुस्लीम मतदारांनीही काँग्रेस-सपा युतीच्या बाजूनं कौल दिल्याचं स्पष्ट झालंय. त्याचाही भाजपाला फटका बसलाय.
Lok Sabha 2024 UP Result: उत्तर प्रदेशात अतिआत्मविश्वास नडला; व्होट बँक कशामुळे घटली, भाजपच्या पराभवाची पाच कारणे

महाराष्ट्रात काय झालं?

महाराष्ट्रात शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाशी भाजपची महायुती होती. भाजपानं यंदा 48 पैकी 28 जागा लढवल्या होत्या. मागील निवडणुकीपेक्षा तीन जागा जास्त लढवूनही भाजपाला अपेक्षित यश मिळणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर झालेली ही पहिलीच मोठी निवडणूक होती. या निवडणुकीत मतदारांचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना असल्याचं स्पष्ट झालंय. मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर तयार झालेल्या जातीय समीकरणाचाही भाजपला फटका बसल्याचं स्पष्ट झालंय. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपल्या पक्षाची पारंपरिक मतं भाजपकडं वळवण्यात अपयश आलं, हे देखील भाजपाच्या पिछेहाटीचं मुख्य कारण आहे.

या सर्वांसोबतच विद्यमान खासदारांवरील नाराजी देखील भाजपाला भोवलीय. 2014 आणि 2019 मधील निवडणुकीत मोदी लाटेत भाजपाचे खासदार निवडून आले. या निवडणुकीत ही लाट महाराष्ट्रात ओसरली. त्यावेळी खासदारांची प्रतिमा, त्यांचं मतदारसंघातील काम याचा कस लागला. त्यात भाजपाचे विद्यमान खासदार अपयशी ठरले.

पश्चिम बंगालमध्ये भाजपला फटका

भाजपला दुसरा मोठा फटका हा पश्चिम बंगालमध्ये बसला आहे. येथे तृणमूल कॉंग्रेस ३१ जागांवर आघाडीवर असून भाजप १० जागांवर आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे १८ खासदार निवडून आले होते. येथे भाजपला ८ जागांचं नुकसान होताना दिसत आहे. ममता बॅनर्जी यांनी सीएएच्या मुद्द्यावर भाजपविरोधात प्रचार केला होता. त्यामुळे मुस्लिम समुदाय तृणमूलच्या बाजूने गेल्याचे दिसून आले आहे. आणि त्याचाच मोठा फटका भाजपला बसला आहे.

इंडिया आघाडी सत्तेत येऊ शकते का ?

निकालाच्या आकडेवारीकडे आपण जर पाहिलं तर सध्या इंडिया आघाडीला 230 जागा जागा मिळालेल्या आहेत तर एनडीए ला 295 जागांवर वर्चस्व मिळवता आलं आहे. केंद्रात सत्ता आणायची असेल तर 272 जागांचे बहुमत असणे गरजेचे आहे. इंडिया आघाडीबरोबर जर एनडीए मधील काही घटकपक्ष गेले तरच इंडियाची आघाडीची सत्ता येऊ शकते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.