Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

युरोपीय महासंघाच्या संसदेत उजव्या पक्षांची सरशी; फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्सुएल मॅक्रॉन यांचाही निवडणुकीत दारुण पराभव

5

वृत्तसंस्था, ब्रसेल्स : युरोपीय महासंघाच्या (ईयू) निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या पक्षांची सरशी झाली आहे. विविध देशांच्या सत्ताधारी सरकारांचे मोठे नुकसान झाले आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनाही निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या पक्षाने युरोपीय महासंघात आपल्या जागा दुप्पट केल्याने २७ सदस्यांच्या गटात सत्तेची चावी उजव्या विचारसरणीच्या पक्षांच्या हाती गेली आहे.

यंदाच्या निवडणुकीत जर्मनीतील उजव्या विचारसरणीच्या ‘अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी’ला आपल्या उमेदवारांशी संबंधित घोटाळ्याला सामोरे जावे लागले होते. चॅन्सलर ओलाफ शोल्झ यांच्या ‘सोशल डेमोक्रॅट्स’ पक्षाचा पराभव झाला आहे. ‘अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी’ने ११ टक्क्यांवरून १६.५ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे.

फ्रान्समध्ये काय घडले?

रविवारी रात्री झालेल्या निवडणुकीत अतिउजव्या पक्षाच्या मरीन ली पेन यांच्या नॅशनल रॅली पक्षाचे वर्चस्व होते. त्यामुळे मॅक्रॉन यांनी तत्काळ संसद बरखास्त केली आणि मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या. मॅक्रॉन यांच्यासाठी हा मोठा राजकीय धोका आहे, कारण त्यांच्या पक्षाला अधिक नुकसान सोसावे लागू शकते. ली पेन म्हणाल्या ‘आम्ही देश बदलण्यास तयार आहोत, फ्रान्सच्या हितांचे रक्षण करण्यास तयार आहोत, सामूहिक स्थलांतराची समस्या संपविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’ मॅक्रॉन यांच्या पक्षाच्या तुलनेत त्यांच्या ली पेन यांच्या ‘नॅशनल रॅली’ पक्षाला ३० टक्क्यांहून अधिक म्हणजे दुप्पट मते मिळाली. मॅक्रॉन यांनी पराभव स्वीकारला आहे. ‘या मतदानातून मिळालेला संदेश मला समजला आहे. मुदतपूर्व निवडणुका घेणे हे केवळ त्यांची लोकशाही ओळख अधोरेखित करते,’ असे मॅक्रॉन म्हणाले. एकूणच युरोपिय महासंघामध्ये ख्रिश्चन डेमोक्रॅट्स आणि समाजवादी हे दोन मुख्य प्रवाहातील युरोपसमर्थक गट प्रबळ राहिले.

जॉर्जिया मेलोनींचे वर्चस्व
वृत्तसंस्था, रोम

पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या उजव्या विचारसरणीच्या पक्षाने इटलीतील युरोपियन निवडणुकांमध्ये २८ टक्के मताधिक्याने विजय मिळवला. मेलोनी यांच्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ पक्षाने देशांतर्गत वर्चस्वही राखले असून, युरोपमध्ये किंगमेकरची भूमिका निभावली आहे.

मेलोनी यांच्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ पक्षाने २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जिंकलेल्या २६ टक्क्यांच्या तुलनेत आपली कामगिरी सुधारून देशातील सर्वात लोकप्रिय पक्ष म्हणून आपली नवी ओळख मिळवली आहे. मटेओ साल्विनी यांचा कट्टर उजवा पक्ष यंदा फारसा प्रभाव टाकू शकला नाही. सन २०१९ च्या युरोपीय महासंघाच्या निवडणुकीत ३४ टक्क्यांहून अधिक मतांसह पहिल्या स्थानावर राहिलेल्या लीगला या वेळी केवळ ८.५ टक्के मते मिळाली.
‘आम्ही जी-७ गटामध्ये असून, आमचे सरकार अधिक मजबूत झाले आहे. याचा मला अभिमान आहे,’, असे मेलोनी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

युरोपीय महासंघातील राजकीय पक्ष…..एकूण जागा….टक्केवारी
ईपीपी : ग्रुप ऑफ युरोपियन पीपल्स पार्टी….१८६….२५.८३ टक्के
एस अँड डी : ग्रुप ऑफ प्रोग्रेसिव्ह अलायन्स ऑफ सोशालिस्ट डेमोक्रॅट्स इन युरोपिय युनियन….१३४….१८.६१ टक्के
रिन्यू युरोप……७९…………१०.९७ टक्के
ईसीआर : युरोपियन कन्झर्व्हेटिव्ह….७३…..१०.१४ टक्के
आयडी (आयडेंटीटी अँड डेमोक्रसी ग्रुप)…..५८…..८.०६ टक्के
ग्रीन्स-ईएफए……५३…………७.३६ टक्के
द लेफ्ट : लेफ्ट ग्रुप इन युरोपियन पार्लमेंट….३६……५ टक्के
एनआय (अपक्ष)………४६………..६.३९ टक्के
इतर………….५५………………७.६४ टक्के

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.