Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आता Linkedinवर सहज शोधा तुमची आवडती नोकरी, AI झटपट बनवेल तुमचा Resume

9

आजकाल अनेक युजर्स नोकरीच्या शोधासाठी LinkedInचा वापर करतात. आता या प्लेटफॉर्मने हे काम अधिक सोपे करण्यासाठी नवीन AIफिचर लाँच केले आहे. आता युजर्सना फक्त एक प्रॉम्प्ट द्यावा लागेल, त्यानंतर AI टूल तुम्हाला त्या कीवर्डशी संबंधित जॉब दाखवेल. LinkedInचे AI अपडेट सध्या फक्त प्रीमियम व्हर्जनसाठी आणले जात आहे. याशिवाय हे टूल सध्या केवळ इंग्रजीला भाषेला सपोर्ट करते आहे.

सर्व प्रोफेशनल लोकांचे लिंक्डइन अकाऊंट असते, ज्यांच्याकडे अकाऊंट नाही, ते नोकरीला लागल्याच्या काही काळानंतर ते तयार करतात. लोक सहसा त्यांच्या प्रोफेशनमधील लोकांशी कनेक्ट होण्यासाठी LinkedIn वर अकाऊंट तयार करतात. यामुळे LinkedIn लोकांना नोकऱ्या शोधण्यातही मदत करते. आता मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या लिंक्डइनने एक नवीन AI फिचर सादर केले आहे जे लोकांना नोकरी शोधण्यात उपयुक्त ठरू शकते.

यूजर्सना द्यावा लागेल प्रॉम्ट

LinkedIn ने आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI चा सपोर्ट त्याच्या प्लॅटफॉर्मवर जारी केला आहे ज्यामुळे युजर्सना नोकऱ्या शोधण्यात मदत होईल आणि ते अगदी कमी वेळात नोकऱ्या शोधू शकतील. यूजर्सना यात त्यांच्या आवडत्या नोकरीसाठी फक्त एक प्रॉम्प्ट द्यावा लागेल, त्यानंतर AI टूल तुम्हाला त्या कीवर्डशी संबंधित जॉब दाखवेल. LinkedIn चे AI अपडेट सध्या फक्त प्रिमियम व्हर्जनसाठी आणले जात आहे. याशिवाय हे टूल सध्या केवळ इंग्रजी भाषेला सपोर्ट करते.

चॅटबॉट करणार तुमची मदत

आता लिंक्डइनवर एआय सपोर्ट असलेला चॅटबॉटही आला आहे. हा चॅटबॉट नोकऱ्या देखील शोधेल आणि नोटीफीकेशन्सच्या आधारे तुम्हाला माहिती देईल. उदाहरणार्थ, तुम्ही “Find me a job in Data analysis within my network” सारखा जॉब प्रॉम्प्ट देऊ शकता. यानंतर तुम्हाला याविषयीचे रिझल्ट्स दिसतील. LinkedIn चे हे AI टूल युजर्सचा रिझ्युमे देखील रिव्ह्यू करेल. शिवाय हे टूल यूजर्सला कव्हर लेटर कसे तयार करावे याबद्दल टिप्स आणि आयडिया देखील देईल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.