Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एक पिस्टल व दोन राऊंड जप्त गुन्हे शाखा, युनिट-३ ची कामगिरी

108

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

Pune-गुन्हेगाराकडून एक पिस्टल व दोन राऊंड जप्त गुन्हे शाखा, युनिट-३ कडून अटक

गुन्हे शाखा, युनिट ३, पुणे कडील सहायक पोलीस फौजदार सुनिल पवार यांना मिळाले बातमी नुसार सराईत गुन्हेगार नामे जयेश विजय लोखंडे, वय.२४ वर्षे, राहिला २२४, मंगळवार पेठ, पुणे

दिनांक १८/०६/२०२४ रोजी १५.१० वा. कै.धोंडिबा गुणाजी बने रोडवरील जवळील फर्ग्यूसन कॉलेजच्या बंद असलेल्या गेट क्रमांक ३ जवळ, शिवाजीनगर पुणे येथे पकडले. त्याचेकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, दोन राऊंड असा एकुण ४१,०००/- रू किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून तो नेहमी घातक शस्त्रे बाळगत असतो. त्याचेविरूध्द मोका, दरोडा, दरोडयाची तयारी, जबरी दुखापत, बेकायदेशीर जमाव जमविणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सराईत गुन्हेगार जयेश विजय लोखंडे, वय.२४ वर्षे, राहिला २२४, मंगळवार पेठ, पुणे आरोपी हा अलंकार पोलीस ठाणे मध्ये अटक आहे.

सदरची कामगिरी ही, मा. पोलीस आयुक्त, श्री अमितेश कुमार, पुणे शहर मा. पोलीस सह-आयुक्त, श्री प्रवीण पवार, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री शैलेश बलकवडे, पुणे मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, श्री. सुनिल तांबे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, पोलीस अंमलदार सुनिल पवार, शरद वाकसे, पांडूरंग कामतकर, केदार आढाव, संजिव कळंबे, ज्ञानेश्वर चित्ते, साईनाथ पाटील, सतीश कत्राळे, राकेश टेकावडे, गणेश शिंदे, सोनम नेवसे यांचे पथकाने केली आहे.दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.