Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Infinix Note 40 5G: वायरविना चार्ज होणारा सर्वात स्वस्त फोन लाँच; 108MP कॅमेऱ्यासह मिळतोय 8GB रॅम

11

Infinix चा आणखी स्‍मार्टफोन Infinix Note 40 5G भारतात लाँच झाला आहे. मिड-रेंज मध्ये आलेल्या या डिवाइसची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात मॅगसेफ वायरलेस चार्जिंग मिळते. Infinix Note 40 5G मध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला FHD+ डिस्‍प्‍ले आहे. मीडियाटेकचा डायमेन्सिटी प्रोसेसर देण्यात आला आहे. 32 एमपीचा सेल्‍फी कॅमेरा या डिव्हाइसमध्ये आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

Infinix Note 40 5Gची किंमत

ओब्सीडियन ब्लॅक आणि टायटन गोल्ड या दोन कलर्स मध्ये Infinix Note 40 5G भारतात आला आहे. याची किंमत 19999 रुपये आहे ज्यात 8GB RAM सह 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची विक्री 26 जूनपासून सुरु होईल आणि हाइसे फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल. तसेच एसबीआय, एचडीएफसी आणि अ‍ॅक्सिस बँक कार्ड धारकांना 2 हजार रुपयांचा इंस्‍टेंट डिस्‍काउंट मिळेल. 2 हजार रुपयांचा एक्‍सचेंज बोनस देखील मिळवता येईल. मर्यादित कालावधीसाठी कंपनी या डिवाइससह 1999 रुपयांचा Infinix MagPad फ्री देत आहे.
Vivo Y58 5G: 6000mAh ची बॅटरी आणि 16GB रॅम असलेला स्वस्त 5G फोन लाँच; किंमत 20 हजारांच्या आत

Infinix Note 40 5Gचे स्पेसिफिकेशन्स

Infinix Note 40 5G मध्ये 6.78 इंचाचा AMOLED डिस्‍प्‍ले देण्यात आला आहे. हा फुलएचडी प्‍लस रिजोल्यूशनसह 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट ऑफर करतो. पीक ब्राइटनैस 1300 निट्स आहे आणि PWM डिमिंग 2160Hz आहे. त्यामुळे डोळ्यांना जास्त त्रास होत नाही.

Infinix Note 40 5G मध्ये मीडियाटेकचा डायमेन्सिटी 7020 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतीला 8GB LPDDR4X RAM आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. एसडी कार्डच्या माध्यमातून स्‍टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे. जी 33 वॉट फास्‍ट चार्जिंगला सपोर्ट करते, तसेच 15W वायरलेस मॅगसेफ चार्जिंगला सपोर्ट करते.

नवीन इनफ‍िनिक्‍स फोन लेटेस्‍ट अँड्रॉइड 14 वर चालतो. याचा मेन रियर कॅमेरा 108 मेगापिक्‍सलचा आहे. त्याचबरोबर 2 एमपीचा मॅक्रो आणि एक डेप्‍थ लेन्स आहे. फ्रंटला 32 एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे. चांगल्या साउंडसाठी यात स्‍टीरियो स्‍पीकर्स देण्यात आले आहेत, ज्यासाठी जेबीएल सोबत भागेदारी करण्यात आली आहे. इन डिस्‍प्‍ले फ‍िंगरप्रिंट सेन्सर, टाइप-सी पोर्ट असे फीचर्स देखील मिळतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.