Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

डीएलएड प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास २५ जूनपर्यंत मुदतवाढ – महासंवाद

7

मुंबई, दि. 21 : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता डीएलएड (D.El.Ed) प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 18 जून 2024 रोजीपर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि, बऱ्याच संस्था, लोकप्रतिनिधी व संघटनांनी मागणी केल्यामुळे हे अर्ज भरण्यासाठी 25 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राज्यस्तरीय डीएलएड प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी कळविले आहे.

या बाबतच्या सर्व सूचना, प्रवेशपात्रता इ. बाबी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे च्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी उमेदवारांनी व शैक्षणिक संस्थांनी वेळोवेळी संकेतस्थळ पाहण्याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.