Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अंतराळात चीनचा निष्काळजीपणा! पृथ्वीवर आदळला रॉकेटचा एक पार्ट, पाहा काय घडले

11

अंतराळातील चीनच्या निष्काळजीपणामुळे जग धोक्यात येत आहे का? अमेरिकन स्पेस एजन्सी नासा (NASA) बऱ्याच काळापासून असे आरोप करत आहे की मिशन अंतराळ मिशन पूर्ण झाल्यांनतर चीन त्यांच्या रॉकेट्सची योग्य विल्हेवाट लावण्याचे काम करत नाही. याचे उदाहरण शनिवारी पाहायला मिळाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनच्या लॉन्ग मार्च 2-C रॉकेटचा एक पार्ट पृथ्वीवरच्या लोकवस्तीच्या भागात आदळला.

घटनास्थळी नेमके काय घडले

रिपोर्ट्सनुसार, लॉंचनंतर झालेल्या स्फोटामुळे लॉन्ग मार्च 2-C रॉकेटचा तुकडा पृथ्वीवर पडला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात काही लोकांना रस्त्यांवर धावताना दिसत आहेत. रॉकेटचा एक तुकडा लोकवस्तीच्या भागात पडला. या घटनेत जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

रॉकेटने शिचांग सॅटेलाइट लॉन्च सेंटरमधून उड्डाण केले होते. चीन आणि फ्रान्सने एकत्रितपणे बनवलेल्या सॅटेलाइटसह हे रॉकेट अंतरिक्षात उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही वेळातच रॉकेटचा एक भाग (बूस्टर) पुन्हा पृथ्वीवर पडला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

लोकांमध्ये भीतीचे वातावरण

रिपोर्ट्सनुसार, घटनास्थळी उपस्थित लोक खूप घाबरले होते. त्यांनी आपले प्राण वाचवण्यासाठी रस्त्यावर धाव घेतली. जळत असलेला रॉकेटचा तुकडा लोकवस्तीच्या भागात पडला. लॉन्ग मार्च 2-C मध्ये नायट्रोजन टेट्रोक्साइड (Nitrogen Tetroxide) आणि अनसिमेट्रिकल डाइमेथिलहाइड्राजिन (UDMH) या विषारी मिश्रणाचा वापर केला जातो, जो मनुष्यासाठी अत्यंत घातक आहे.

सॅटेलाईटवर कोणताही परिणाम नाही

रॉकेटच्या पडण्यामुळे लोक या विषारी रसायनांच्या संपर्कात आले असतील का, याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. एक चांगली गोष्ट म्हणजे बूस्टरच्या पडण्यामुळे मिशनवर कोणताही परिणाम झाला नाही. सॅटेलाइट यशस्वीपणे कक्षेत पोहोचला आहे.

नासाचे आरोप आणि चीनच्या अंतरिक्ष महत्त्वाकांक्षांमुळे भविष्यातील अंतरिक्ष मोहिमांमध्ये अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा घटना पुढे येऊन मनुष्य आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.