Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Samsung Unpacked Event
Samsung Unpacked इव्हेंटचे आयोजन 10 जुलै, 2024 ला केले जाईल. या इव्हेंटचं लाइव्ह स्ट्रीमिंग अनेक प्लॅटफॉर्मवर केली जाईल. इव्हेंटची सुरुवात संध्याकाळी 6:30 वाजता (भारतीय वेळेनुसार) होईल. हा इव्हेंट Samsung.com आणि कंपनीच्या युट्युब चॅनेलवर लाइव्ह पाहता येईल.
ब्रँडनं दिलेल्या इन्व्हिटेशनमध्ये लिहिण्यात आलं आहे की Galaxy AI ची पावर शोधण्यासाठी सज्ज व्हा, जी आता नवीन गॅलेक्सी Z सीरीज आणि संपूर्ण गॅलेक्सी इकोसिस्टममध्ये समाविष्ट केली जाईल. त्यामुळे वाटत आहे की सॅमसंग नवीन इकोसिस्टम प्रोडक्टसह नवीन Z-सीरीज डिवाइस देखील सादर करेल.
इव्हेंटमध्ये लाँच होऊ शकतात हे प्रोडक्ट
या इव्हेंटमध्ये Galaxy Z Fold 6, Galaxy Z Flip 6, Galaxy Ring, Galaxy Watch Ultra आणि Galaxy Watch 7 series चे प्रोडक्ट लाँच केले जातील. कंपनी गॅलेक्सी एआय देखील अनपॅक्ड इव्हेंटचा महत्वाचा मुद्दा ठरू शकतो. कंपनी नवीन AI फीचर्स सादर करेल. यंदाच्या इव्हेंटमध्ये लाँच होणाऱ्या इतर प्रोडक्टची कोणतीही खास माहिती समोर आली नाही.
आगामी फोल्डेबल फोनचे काही खास फीचर्स लीक रिपोर्ट्समध्ये समोर आले आहेत. Samsung Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 दोन्ही फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर मिळू शकतो. हे दोन्ही फोन्स 25W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येऊ शकतात.
Samsung Galaxy Z Fold 6 कंपनी अनेक कलर ऑप्शनमध्ये सादर करू शकते. यात ब्लू, मिंट, येलो, सिल्व्हर शॅडो, व्हाइट आणि क्राफ्टेड ब्लॅकचा समावेश आहे. Galaxy Z Flip 6 फोन पिंक, नेव्ही, सिल्व्हर शॅडो, पीच, व्हाइट आणि क्रॉफ्टेड ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येऊ शकतो.
इतकंच नव्हे तर इव्हेंटमध्ये कंपनी अल्ट्रा नावांतर्गत आपलं पाहिलं अल्ट्रा स्मार्टवॉच देखील सादर करू शकते. याचे नाव Samsung Galaxy Watch Ultra आहे. याची तुलना Apple Watch Ultra 2 शी होईल. लीक रिपोर्ट्सनुसार, हे मॅट-फिनिश फ्रेमसह चौकोनी डिजाइनसह येईल. याचा व्यास 1.5 इंच आणि फिरणाऱ्या बेजलसह एक गोलाकार डिस्प्ले मिळेल. कंपनी आपला आगामी डिवाइस लवकरच प्री-ऑर्डर घेण्यास सुरु करेल.