Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

China Asteroid Mission: अंतराळात 100 फुटांपेक्षा मोठ्या लघूग्रहावर आदळणार चीनचे स्पेसक्राफ्ट, 2030 पर्यंत पूर्ण होईल हे मिशन

13

China Asteroid Mission: अंतराळात एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो. यामुळे पृथ्वीला असणाऱ्या संभाव्य धोक्याबद्दलही सांगितले जाते. आता भविष्यात आपल्या ग्रहाचे अशा धोक्यांपासून संरक्षण करण्याचे काही स्पेस एजन्सीजने ठरवले आहे. यासाठी चीननेही एक नवीन मिशन लाँच केले आहे. काय आहे ते मिशन जाणून घेऊया..

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आपल्या अंतराळात लाखो ऑब्जेक्ट्स आहेत, जे पृथ्वीला धोकादायक ठरू शकतात. अमेरिकी अंतरिक्ष एजन्सी नासा (Nasa) ने या धोक्याचा सामना करण्यासाठी DART मिशन पूर्ण केले होते. त्या अंतर्गत, एक स्पेसक्राफ्ट लघूग्रहावर आदळले आणि याद्वारे भविष्यातील संभाव्य धोक्यांना टाळण्याचा प्रयत्न केला जावू शकतो का याचा अभ्यास करण्यात आला होता. आता चीननेही अशाच प्रकारची योजना आखली आहे. त्यांनी अंतराळातील खडकांचा अभ्यास करण्याचे ठरवले आहे. हे मिशन वर्ष 2030 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

स्पेसडॉटकॉम आणि द प्‍लेनेटरी सोसायटीच्या अहवालानुसार, चीनने आपले टार्गेट निवडले आहे. चाइना नॅशनल स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (CNSA) च्या नजरेत 2015 XF261 नावाचा एक लघूग्रह आहे. त्याचा आकार सुमारे 100 फुट रुंद आहे. Nasa च्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या डेटाबेसनुसार, 2015 XF261 हा लघूग्रह पृथ्वीच्या जवळ 9 जुलैला आला होता. तो आपल्या पृथ्वी ग्रहापासून 50 मिलियन किलोमीटर अंतरावरून गेला. त्यावेळी त्याचा स्पीड 42 हजार किलोमीटर प्रति तास इतका होता.

अमेरिकेचे DART मिशन काय होते?

वर्ष 2022 मध्ये अमेरिकी अंतरिक्ष एजन्सी नासा (Nasa) ने DART मिशन पूर्ण केले होते. 26 सप्टेंबर 2022 रोजी नासाच्या डबल लघूग्रह रीडायरेक्शन टेस्ट (DART) स्पेसक्राफ्टने डिमोर्फोस (Dimorphos) नावाच्या एका लघूग्रहाला टक्‍कर दिली होती. टक्‍कर करून नासा हे जाणून घेऊ इच्छित होते की, यामुळे लघूग्रहाची कक्षा बदलते की नाही. हे मिशन यशस्वी झाले होते. नासा या निष्कर्षावर पोहोचली की भविष्यात आढा घटना घडल्यास लघूग्रहाची दिशा बदलता येईल आणि पृथ्वीला धोकादायक असणारे लघूग्रह पृथ्वीपासून दूर ढकलता येतील. आता चीनही असेच करण्याचा विचार करीत आहे.

मानवासाठी महत्त्वाचे ठरेल हे मिशन

चीनच्या या मिशनमुळे जागतिक अंतरिक्ष संशोधनात मोठी प्रगती होऊ शकते. या मोहिमेच्या यशस्वीतेमुळे भविष्यातील अंतरिक्ष संशोधनासाठी नवीन मार्ग उघडतील. विशेषतः, अंतरिक्षातील धोकादायक ऑब्जेक्ट्सचे निरीक्षण आणि त्यांच्याशी संबंधित धोके ओळखण्याची क्षमता वाढेल. हे मिशन अंतराळात मानवाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरेल. हे मिशन चीनच्या अंतरिक्ष संशोधन क्षमतांना आणखी मजबुती देईल आणि त्यांना जागतिक अंतरिक्ष संशोधनाच्या आघाडीवर नेईल.

गौरव कुलकर्णी

लेखकाबद्दलगौरव कुलकर्णीगौरव कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्स येथे कन्सल्टंट डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. २ वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांविषयी लिहित आहे. त्याने यापूर्वी लाइफस्टाइल व अर्थ विषयात लिखाण केले आहे. Times internet संचलित MENSXP आणि Mahamoney.Com येथे त्याने काम केले आहे. यासोबतच त्याला विज्ञान व टेक्नोलॉजी या विषयात विशेष रस आहे. याव्यरिक्त तो लेखक, कवी आणि दिग्दर्शक देखील आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.