Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Diamond Layer On Mercury: बुध ग्रहावर सापडला खजिना; दिसला 15 किमी जाडीचा हिऱ्याचा थर, जाणून घ्या पृथ्वीवर आणता येतील का हे हिरे
Diamond Layer On Mercury: बुधा ग्रहावर 9 मैल जाडीचा म्हणजेच 14.48 किलोमीटर रुंद हिऱ्याचा थर सापडला आहे. हा थर ग्रहाच्या पृष्ठभागाच्या खाली आहे. नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातून ही बाब समोर आली आहे. एवढ्या प्रमाणात असलेले हिरे पृथ्वीवर आणता येत नाहीत. पण त्यांचा अभ्यास करून बुध ग्रहाची निर्मिती आणि त्याच्या चुंबकीय क्षेत्राविषयी माहिती मिळू शकते.
बुध ग्रहामध्ये अनेक रहस्ये
बुध ग्रहामध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत. सर्वात मोठे रहस्य म्हणजे त्याचे चुंबकीय क्षेत्र. या ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीच्या तुलनेत खूपच कमकुवत आहे. कारण हा ग्रह खूपच लहान आहे. तसेच हा भौगोलिकदृष्ट्या ॲक्टिव्ह नाही. त्याचा पृष्ठभाग अनेक ठिकाणी गडद रंगाचा असल्याचे दिसते.
हिऱ्याच्या अभ्यासामुळे ग्रहाविषयी मिळेल माहिती
नासाच्या मेसेंजर मिशनने बुध ग्रहाच्या पृष्ठभागावरील गडद रंग ग्रेफाइट म्हणून ओळखले होते. जे कार्बनचे एक रूप आहे. बीजिंगमधील सेंटर फॉर हाय प्रेशर सायन्स अँड टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स्ड रिसर्चचे शास्त्रज्ञ यानहाओ ली यांनी सांगितले की, बुध ग्रहाचे रहस्य त्याच्या आतील स्तर आणि संरचनेचा अभ्यास करूनच उघड होऊ शकते.
15 किमी जाड हिऱ्याचा थर, हे एक मोठे रहस्य
यान्हाओ ली यांनी सांगितले की,“आम्हाला शंका आहे की हा ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच तयार झाला आहे. म्हणजेच, गरम मॅग्मा वितळल्यानंतर. पण बुध ग्रहातील मॅग्माचा हा समुद्र कार्बन आणि सिलिकेटने समृद्ध असावा. त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात हिरे सापडले आहेत. तोही एक पूर्णपणे घन हिरा.याचा आतील गाभा मजबूत धातूंचा असेल.”
जाणून घ्या अशा प्रमाणात का असतात हिरे
2019 मध्ये, एक अभ्यास समोर आला ज्यामध्ये असे म्हटले होते की बुध ग्रहाचे आवरण पूर्वी लावलेल्या अंदाजांपेक्षा 50 किलोमीटर खोल आहे. याचा अर्थ असा की, यामुळे गाभा आणि आवरण यांच्यामध्ये खूप दबाव निर्माण होऊन त्यामुळे ग्रहाच्या आत असलेला कार्बन हिऱ्यांमध्ये बदलत असावा. यामुळेच हिऱ्यांचा इतका जाड थर सापडला आहे.