Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी विकी कौशलचा बॅड न्यूज हिट की फ्लॉप? ओपनिंग डे ची कमाई किती?

10

मुंबई– पावसाळ्याचा हंगाम सुरु झाल्यापासून चित्रपटगृहांमध्ये एकापाठोपाठ एक सिनेमे दाखल होत आहेत. गेल्या आठवड्यात ‘इंडियन २’ आणि ‘सरफिरा’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले तर काल बॅड न्यूज हा सिनेमासुद्धा काल दाखल झाला. ‘कल्की 2898 एडी’ वगळता, इतर चित्रपटांची स्थिती बॉक्स ऑफिसवर परिस्थिती थोडी बिकट होती, पहिल्या दिवशी ‘बॅड न्यूज’ची स्थिती काय होती ते जाणून घेऊ.Sukh Mhanje Nakki Kay Asta: लोकप्रिय अभिनेत्रीची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधून एक्झिट; पुढे काय होणार हेच सांगून टाकलं!
आनंद तिवारी दिग्दर्शित ‘बॅड न्यूज’ हा एक रोमँटिक कॉमेडी ड्रामा आहे, ज्यात विक्की कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क या त्रिकुटाची भूमिका आहे. १९ जुलै रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. ज्याला समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

Naseeruddin Shah: आयुष्यभर नसीरुद्दीन शहांचा वडिलांशी अबोला, निधनानंतर कबरीवर जाऊन केलं मन मोकळं
करण जोहर निर्मित ‘बॅड न्यूज’ बद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. हॉरर, ॲक्शन थ्रिलर आणि बायोपिकनंतर लोक रोम-कॉम चित्रपट ‘बॅड न्यूज’ची वाट पाहत होते. ट्रेलर आणि रोमँटिक गाण्यांमुळे विकी आणि तृप्ती चर्चेत होते. आता अखेर चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनही समोर आले आहे.

‘बॅड न्यूज’ने पहिल्या दिवशी किती कमाई केली?

Sacknilk ने दिलेल्या माहितीनुसार, विकी कौशल स्टारर चित्रपट ‘Bad News’ ने पहिल्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ५.४४ कोटी रुपयांचा अंदाजे व्यवसाय केला आहे. हे प्रारंभिक आकडे आहेत. कमाईतही वाढ अपेक्षित आहे.

काय आहे ‘बॅड न्यूज’ची स्टोरी?

इशिता मोईत्रा आणि तरुण दुडेजा यांनी लिहिलेला ‘बॅड न्यूज’ हा २०१९ च्या ‘गुड न्यूज’ फ्रेंचाइजी चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात सलोनी बग्गा (तृप्ती डिमरी) हीच्या पोटात जुळी मुली आहेत. मनोरंजक गोष्ट म्हणजे या मुलांना एक नाही तर दोन वडील (विकी आणि एमी) आहेत. आता या दोघांपैकी ती आपल्या मुलाचा बाप म्हणून कोणाची निवड करणार, याभोवतीच ही कथा फिरतेय.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.