Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Spacesuit: युरीनचे रूपांतर पिण्याचे पाण्यात करेल हा स्पेस सूट; असा होईल फायदा

18

Spacesuit Will Turn Urine Into Water: अंतराळवीरांच्या समस्या पृथ्वीवरील लोकांपेक्षा खूप वेगळ्या असतात. स्पेस स्टेशनमध्ये राहणाऱ्या अंतराळवीरांसाठी टॉयलेट ही खूप मोठी समस्या आहे. यावर मात करण्यासाठी एक नवीन स्पेस सूट तयार करण्यात आला आहे. ज्यात एक ओस्मॉसिस फिल्टर असेल ज्याची मदतीनं हा युरीन पिण्याच्या पाण्यात रूपांतरित करता येईल. चला पाहू याची माहिती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अंतराळात स्पेस स्टेशनमध्ये राहणाऱ्या अंतराळवीरांना जगावेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. तिथे खाणे-पिणे, लघवी करण्यासाठी देखील खास सोय करावी लागते. त्याचप्रमाणे स्पेस स्टेशनमध्ये राहणाऱ्या अंतराळवीरांसाठी टॉयलेटची सुविधा ही एक मोठी समस्या असते. आतापर्यंत अंतराळवीर अवकाशात लघवी करण्यासाठी खास डायपरचा वापर करत होते ज्यांचा पुरवठा नासा कडून केला जायचा. परंतु आता एक नवीन डिवाइसचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे ज्यामुळे युरीनचे रूपांतर पिण्याच्या पाण्यात होईल.

New Scientist च्या रिपोर्टनुसार,न्यूयॉर्कमध्ये संशोधकांनी 8 किलो वजनाचा एक असा डिवाइस तयार केला आहे जो स्पेससूट मध्ये फिट करता येईल. यात एक ओस्मॉसिस फिल्टर देण्यात आला आहे ज्याच्या मदतीनं युरीनचे रूपानंतर पिण्यालायक पाण्यात करता येईल. Cornell University च्या वैज्ञानिकांनी या नवीन डिवाइस बाबत Frontiers in Space Technology नावाच्या जर्नलमध्ये सांगितलं आहे.
Bharatiya Antariksha Station: पृथ्वीपासून 450 किमी उंचीवर राहू शकतील 6 लोक; भारतीय अंतरिक्ष स्टेशनची नवीन डिजाइन आली समोर

रिसर्च टीमनं याबाबत एक गोष्ट नमूद केली आहे की सध्या वापरात असलेली डायपर सिस्टम छोट्या कालावधीसाठी वापरता येते. परंतु स्पेस वॉक दरम्यान जर अंतराळवीरांची अ‍ॅक्टिव्हिटी दीर्घकाळ चालते अशावेळी दीर्घकालीन उपाय आवश्यक आहे.

NASA सध्या अंतराळवीरांचं युरीन पास करण्यासाठी Maximum Absorbency Garment चा वापर करते. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर हे एक अडल्ट डायपरचं आहे ज्यात मलमूत्र जमा होतं. स्पेस वॉक संपल्यावर हे डायपर स्पेस स्टेशनच्या वेस्ट सिस्टममध्ये सोडले जातात, जे नंतर पृथ्वीच्या दिशेने येऊन वातावरणात जळून राख होतात.

नवीन सिस्टममध्ये अश्या डिवाइसचा शोध घेण्यात आला आहे जो हलका आहे. हा युरीन मधून पाणी वेगळं करतो आणि ते शुद्ध करतो. ही प्रोसेस फक्त 5 मिनिटांत पूर्ण होते. यात एक ह्यूमिडिटी सेन्सर देखील लगा असेल ज्यामुळे आपोआप युरीन डिटेक्ट होईल.

युरीन डिटेक्ट होताच एक व्हॅक्युम पंप चालू होतो जो युरीनला फिल्टरमध्ये खेचून घेतो. युरीनमधून पाणी काढून ते स्वच्छ केले जाते आणि शुद्ध केले जाते, त्यानंतर स्पेस सूटमधील ड्रिंकिंग बॅगमध्ये पाठवले जाते. सध्या ही सिस्टम टेस्टिंग फेजमध्ये आहे, परंतु लॅबमध्ये ही चांगल्याप्रकारे काम करत आहे.

सिद्धेश जाधव

लेखकाबद्दलसिद्धेश जाधवसिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.